विकास दरासाठी मान्सूनची कामगिरी महत्वाची

व्याजदर ‘जैसे थे’

0

- Advertisement -

मुंबई: महागाईचा दर हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त असून येत्या काळात अन्नधान्य किंमती व पुरवठा हा मान्सूनच्या कामगिरीवर अवलंबून असेल असा अंदाज रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तविला आङे. रिझर्व्ह बँकेने आज पतधोरणात जाहीर करताना व्याजदर जैसे थे ठेवले असून  करोना रुग्णवाढ आर्थिक विकासाला अडथळा ठरत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढण्याची शक्यता होती मात्र तूर्त व्याजदर जैसे थेच ठेवल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. २०२१ च्या चौथ्या तिमाहीत महागाई दर ५ टक्के राहील तर २०२१-२२ च्या पहिल्या समाहित विकास दर ४.४ टक्के राहील तर तिसऱ्या तिमाहीत तो ५.१ टक्के राहील तर २०२०-२१ या वर्षात भारताचा विकास दर १०. ५ टक्के राहील असा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

पूर्ण पतधोरण वाचा:https://rbi.org.in/Scripts/PublicationsView.aspx?id=20350

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात ९६ हजार ९८२ करोनाबाधित रुग्णांची भर पडलीय. याबाबत बँकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली. नव्याने लागू होणारे निर्बंध विकासाला बाधक ठरतील, असे दास यांनी सांगितले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.