रिझर्व्ह बॅंकेचा आदेश, अमेझॅान प्राईमने या योजनेतली सबस्क्रिप्शन केले बंद; फ्रि ट्रायल योजनाही केली बंद

0

- Advertisement -

जगातल्या अग्रगण्य व अवाढव्य अशा ई-कॅामर्स कंपनी अमेझॅानला आता अमेझॅान प्राईम या ओव्हर दी टॅाप (OTT) प्लॅटफॅार्मची सुविधा त्यांच्या भारतातील ग्राहकांसाठीची एका महिन्याच्या कालावधीपुरती असलेली सदस्यता यापुढे सुरु ठेवता येणार ऩाही.

आता अमेझॅानला फक्त त्रैमासिक अथवा वार्षिक सदस्यत्वाच्या योजनाच चालवाव्या लागणार आहेत. अमेझॅान प्राईमची 129 रुपये प्रति महिना अशी एक महीना सदस्यत्व योजना आता सुरु राहणार नाही.

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या एका आदेशामुळे अमेझॅानला असे करणे भाग पडत आहे. बॅंका आणि वित्तीय संस्थांना त्यांच्या अतिरिक्त घटक प्रमाणीकरणासाठी (Additional Factors of Authentication – AFA) साठी रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्वांमुळे हा बदल होतो आहे. या आदेशांची अंमलबजावणी करण्याची 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.

2019 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने 2000 रुपयांपर्यंतच्या आवर्ती आर्थिक व्यवहारांसाठी AFA मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. त्यानंतर त्यात बदल करून त्याची मर्यादा 5000 रुपयांपर्यंतच्या आवर्ती आर्थिक व्यवहारपर्यंत वाढविली होती. त्यापुढील आर्थिक व्यवहारांसाठी ओटीपी लागेल असे स्पष्ट केले होते.

आता वाढीव मुदतीत या मार्गदर्शक तत्वांची योग्य अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा इशारा बॅंकेने दिला आहे.

- Advertisement -

अमेझॅानने आपल्या प्राईम सेवासाठी मासिक योजना काढून टाकली असून तसे त्यांच्या संकेतस्थळाच्या सपोर्ट पेजवर निर्देशित केले आहे. गेल्या 27 एप्रिल पासून विनामुल्य ट्रायलसाठीच्या नव्या सदस्यत्वासाठीची नोंद करण्याचेही तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

सध्या नव्याने अमेझॅान प्राईमचे सदसत्व घ्यावयाचे असल्यास वा चालू सदस्यत्वाचे नुतनीकरण (renew) करायचे असल्यास तीन महिन्यांचे अथवा वार्षिक सदस्यत्व योजनेतच घ्यावे लागणार आहे.

अमेझॅान प्राईमच्या त्रेमासिक सदसत्वसाठी 329 रुपये तर वार्षिक सदस्यत्वासाठी 999 रुपयांच्या योजना आहेत.

रिझर्व्ह बॅंकेने 2019च्या ऑगस्ट महिन्यातच ही मार्गदर्शक तत्वे जारी केली होती, परंतु मोबाईलद्वारे ऑटो बिल पेमेंट तसेच ओटीटी सदस्यत्व शुल्काबाबतीत ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला विविध कंपन्यांनी विनंती केली होती, परंतु आता त्याची मुदत ह्या वर्षीच्या 30 सप्टेंबर पर्यंतच असल्याची माहीती मिळते आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.