पांचजन्यच्या आक्षेपांना अमेझॉनचे उत्तर, भारतातल्या 70 हजारापेक्षा स्थानिकांना दिली निर्यातीची संधी, नेमकं काय म्हणंण आहे कंपनीचं

0

- Advertisement -

नवी दिल्ली: “ईस्ट इंडिया कंपनी २.०” म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्य़ा पांचजन्य या मासिकाने जगप्रसिद्ध ऑनलाईन खरेदी विक्री कंपनी अमेझॉन हल्ला केला. अमेझॉनला “स्वदेशी उद्योजकतेसाठी धोका” असा पांचजन्य या मासिकातील लेखात उल्लेख केल्यानंतर काही तासांतच, ई-कॉमर्स व्यवसायातील या दिग्गज कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. त्यात भारतातील किरकोळ विक्रेते आणि कारागीरांसह छोट्या व्यवसायांवर अमेझॉन कंपनीच्या व्यवसायाने सकारात्मक परिणाम झाला असल्याचे स्पष्ट केले आहे.

“तसेच कोविड साथीच्या दरम्यान देशातील 450 पेक्षा अधिक शहरांतील फर्निचर, स्टेशनरी, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्य उत्पादने, मोबाईल, फोन, कपडे, वैद्यकीय उत्पादने अशा वैविध्यपुर्ण व्यवसायातील तीन लाख नवीन विक्रेते आम्हाला (अमेझॉन कंपनीत) सामील झाले.” कंपनीच्या निवेदनात सोमवारी म्हटले आहे.

तसेच Amazon कंपनीने आपल्या निर्यात व्यवसायाचा पुरावा देत म्हटले आहे की भारतातील अनेक लहान शहरांमधून 70,000 पेक्षा जास्त व्यवसायांना ‘मेड इन इंडिया’ उत्पादने कंपनीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील 200 देशांना विकण्यास मदत झाली असल्याचेही कंपनीने निवेदनात स्पष्ट केले आहे.

का दिलेय अमेझॉन कंपनीने निवेदन…..

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित असलेल्या पंचजन्‍य मासिकाच्या ताज्या अंकात” अमॅझोन: ईस्ट इंडिया कंपनी 2.0 असा लेख लिहिण्यात आला आहे. त्यानंतर मासिकाचे हितेश शंकर ह्यांनी ह्या अंकाच्या मुखपृष्ठाचे एक ट्विटही केले आहे. त्यात अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस आणि शीर्षक दाखवले आहे.

श्री शंकर यांनी त्यानंतर मासिकाच्या ट्विटर अकाऊंटवर एका व्हिडिओसह निवेदन जारी केले आहे, ज्यात ते म्हणतात की Amazon च्या “धमकी” वरील अहवाल ही “एक सत्यकथा” आहे.

भारतीय उद्योग महासंघाचीह लेखास पाठिंबा

- Advertisement -

लेखाचे कौतुक करीत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने देखील लेखाला पाठिंबा दिला आहे,

“… ही वस्तुस्थिती आहे की या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल ईस्ट इंडिया कंपनी सारखेच आहेत (गुणवत्तेची पर्वा न करता स्वस्त दरात माल विकणे…स्पर्धाक्षमतेला धुळिस मिळविणे…आणि बाजारात मक्तेदारी अनुकूल वातावरण तयार करणे,”  असे सीएआयटीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले आहे.

ईस्ट इंडिया कंपनीने नेमके हेच केले… Amazon आणि फ्लिपकार्ट दोघांनाही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक संस्कृतीवर आक्रमण करायचे आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने Amazon आणि फ्लिपकार्टच्या व्यवसाय पद्धतींची चौकशी थांबवण्यास नकार दिला होता.

अमेझॉनने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की ते “त्याच्या बाजारपेठेत कोणत्याही विक्रेत्यास प्राधान्य देत नाही, सर्वांना समान संधी दिली जाते.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुळे असलेल्या पंचजन्‍य मासिकात असा लेख छापून आल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. असा लेख प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ नसून या महिन्याच्या सुरुवातीला इन्फोसिस कंपनीच्या कारभारवर टिका करत त्या कंपनीलाही मासिकाच्या लेखात फटकारले होते – एक माहिती तंत्रज्ञान आहे जे जागतिक व्यापारी समुदायामध्ये भारताची सर्वात मोठी यशोगाथा म्हणून व्यापकपणे पाहिले जाते.

दरम्यान केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी ह्या लेखाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याला “योग्य नाही” असे म्हटले आहे. तर आरएसएसच्या प्रवक्त्याने सांगितले की हे मासिक आमचं “मुखपत्र नाही”.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.