अबब ! आयात केलेल्या स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस 995 रुपये 40 पैश्याला..

0

- Advertisement -

रशियातून भारतात आयात करण्यात आलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आयात करण्यात आलेल्या एका डोसची किंमत भारतात ₹ 995.40 असल्याचे भारतात ही लस बनविणारी कंपनी डॅा. रेड्डीज् यांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस तयार करणार्‍या डॅा. रेड्डीज कंपनी रशियाची स्पुटनिक ही लस रशियाच्या डारेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड बरोबर भागिदारी करीत भारतामध्ये बनवित आहे. भारतात वापरण्यासाठी परवानगी मिळालेली ही तिसरी लस असून ती 91.6 टक्के परिणाम कारक असल्याचे  वैद्यकिय चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे.

आयात करण्यात आलेल्या लसीच्या एका डोसची किंमत ही रु. 948  अधिक 5 टक्के जीएसटी अशी 995.40 रुपयांची असेल, असे भारतीय शेअर बाजारात दाखल केलेल्या कागदपत्रात कंपनीने म्हटले आहे.

- Advertisement -

मात्र भारतात तयार करण्यात येणा-या स्पुटनिक व्ही लसीचे डोस ह्या पेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविडशिल्ड आणि भारत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन यांनी तयार केलेल्या दोन कोविड लसींच्या तुलनेत रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीची कार्यक्षमता अधिक आहे.

जगात फायझर आणि मोडर्ना लसींनंतर, स्पुटनिक व्ही ही उच्च कार्यक्षमता असलेली तीन लसंपैकी एक आहे. दोन-मात्रेत घ्यायच्या ह्या लसीला जागतिक पातळीवर बहुतेक देशांनी वापरासाठी अधिकृतरित्या मंजूरी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनात प्रति डोस १० डॉलरपेक्षा कमी किंमतीची ही लस जगभरातील २० लाखांहून अधिक लोकांना दिली गेली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.