फेसबुकचा भारतात नवा डाव: ‘या’ व्यवसायातही उतरण्याची केली घोषणा

0

- Advertisement -

नवी दिल्ली : जगभरात सोशल मिडीया प्लॅटफॉर्म म्हणून प्रसिद्ध असलेली फेसबुक ही कंपनी आता चक्क कर्जवितरण व्यवसायात उतरली आहे. जगात कुठेही त्यांनी असा व्यवसाय सुरु केला नसून तो ऐकमेव भारतातच असणार असल्याचे फेसबुक इंडीयाचे प्रमुख अजित मोहन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

फेसबुक कंपनी 17 ते 20 टक्के व्याजदराने 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज भारतातील व्यावसायिकांना देणार आहे. त्यातही जर एखादी व्यावसायिक कंपनी अंशतः किंवा पुर्णपणे महिलांद्वारे चालविली जात असेल तर त्यांच्यासाठी व्याजदरात 0.2 टक्के इतकी सवलत मिळणार असल्याचे अजित मोहन यांनी म्हटले आहे.

जगातल्या एकूण वापरकर्त्यांपैकी भारतात जवळपास 20 कोटी व्यावसायिक फेसबुक, व्हॉट्स अप आणि इन्स्टाग्रामचा वापर करतात. नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या व्हॉट्स अपच्या बिझीनेस प्लॅटफॉर्मचा 1.5 कोटी व्यावसायिक लोकांनी वापरही सुरु केला असल्याचे ते म्हणाले.

इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अप हे दोन्ही सोशल मिडीया प्लॅटफॉर्म फेसबुकद्वारे संचलित व नियंत्रित केले जातात.

भारतातील या महत्वाकांक्षी कर्ज व्यवसायासाठी फेसबुक कंपनीने भारतातील व्यावसायिक अलोक मित्तल यांच्या Indifi या नव्याने सुरु झालेल्या छोट्या आणि मध्यम व्यावसायिक कर्ज वितरण करणा-या स्टार्ट अप बरोबर भागिदारी केली आहे.

- Advertisement -

Indifi ही कंपनी कर्ज वितरणासाठी ग्राहकाची पात्रता तपासणे तसेच कर्ज जोखमीचे व्यवस्थापन कऱण्यात फेसबुकला मदत करणार आहे. कंपनीकडे बिगर बॅंकिग वित्त सेवेचा परवाना असून सध्या कंपनी छोट्या आणि मध्य व्यावसायिकांना झिरो कोलॅटरल कर्ज वितरण करीत आहे. फेसबुकमुळे आमच्याही व्यावसायात वाढ होईल असे Indifi कंपनीचे मुख्य कर्ज व्यवसाय अधिकारी आदित्य हरकौली यांनी म्हटले आहे.

मागील वर्षी कोविड आणिबाणीच्या काळात लोकांना मदत व्हावी यासाठी फेसबुकने जवळपास 10 कोटी डॅालर्सची छोट्या व्यावसायिकांना देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी 4 कोटी डॉलर्सची मदत या आधीच दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, हैद्राबाद आणि बेंगलुरू येथील लहान आणि मध्यम व्यावसायिकांना वितरीत करण्यात आल्याचे हरकौली यांनी सांगितले आहे.

येत्या काळात फेसबुक विमा क्षेत्रातील काही कंपन्याबरोबरही काम करण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षात कोविड परिस्थितीमुळे छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना आपला व्यवसाय करताना रोकड सुलभता ठेवणे कठीण बनले आहे. त्यामुळे त्यांना कर्ज वितरण करून काही मदत करणे हा यापाठीमागे उद्देश असल्याचे अजित मोहन यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.