तासाभरात विमा मंजुरी द्या : विमा नियंत्रण प्राधिकरणाचे आदेश (IRDA)

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोविड 19 शी संबंधित आरोग्य विमा हक्कांची पुर्तता पूर्वी पेक्षा जलद होणे अपेक्षित आहे. भारतीय विमा विकास व नियंत्रण प्राधिकरणाने (आयआरडीएआय) कोविड 19 संबंधित आरोग्य विमा दाव्यांचा तोडगा काढण्याबाबत विमा कंपन्यांना मानदंड जारी केले आहेत.

सर्व सामान्य (जनरल इन्श्युरन्स) आणि आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) कंपन्यांना त्यांच्या कॅशलेस मंजूरी संबंधित रुग्णालये व आस्थापनांना मंजूरी साठी जास्तीत जास्त 60 मिनिटांच्या कालावधीत देण्यास सांगितले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या 28 एप्रिलच्या आदेशानुसार आयआरडीएआयला निर्देश दिले आहेत की विमा कंपन्यांना त्यांच्या कॅशलेस मंजूरीसाठी रुग्णालये व आस्थापनांपर्यंत जास्तीत जास्त 30 ते 60 मिनिटांच्या मुदतीत कळवावा, जेणेकरून रुग्णांच्या डिस्चार्जमध्ये विलंब होऊ नये. यामुळे रूग्ण आणि रूग्णालयातील बेड हे जास्त काळ अडकून पडणार नाहीत.

“कोविड 19  रोगग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असताना नियामकांची ही कारवाई पॉलिसीधारकांना चांगली मदत करेल. कोविडशी संबंधित काही दावे निकाली निघण्यास वेळ लागत होता होते जो रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासाठी विलंबकारी ठरत होता. तथापि, एका तासाच्या आत दाव्यांचा निपटारा करण्याच्या या नवीन हालचालीमुळे विमा धारकांना मोठा दिलासा मिळेल आणि कोविड 19 खर्चाचा निपटारा सहज करता येईल. या आदेशामुळे आरोग्य विमा कंपन्यांवर नक्कीच दबाव निर्माण होईल, परंतु हे पॉलिसीधारकांसाठी हा निर्णय वरदान ठरेल, ” विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) एक नोट जारी केली असून ज्यात कॅशलेस प्री-ऑथरायझेशन देण्यासाठी आणि विमाधारकाच्या डिस्चार्जसाठी दोन तासांची टर्न अराऊंड टाईम (टीएटी) निश्चित केला गेला होता.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आयआरडीएआयने खालील निर्देश जारी केले आहेत:

- Advertisement -

  1. कोविड 19 संबंधित दाव्यासाठी कॅशलेस उपचारांच्या ऑथरायझेशनचा निर्णय रुग्णालयातील सर्व आवश्यक अटींसह ऑथरायझेशन रिक्वेस्ट मिळाल्यापासून 60 मिनिटांच्या काळात सेवा देणा-या नेटवर्क हास्पीटलला कळविला जावा.
  2. कोविड 19 च्या दाव्यांमध्ये समाविष्ट असलेल्या रूग्णांच्या अंतिम स्तरावरील निर्णयाबद्दल रुग्णालयाकडून आवश्यक असलेल्या आवश्यक गोष्टींबरोबर अंतिम बिल प्राप्त झाल्यापासून एक तासांच्या आत सेवा देणा-या नेटवर्क हॅास्पीटलला (प्रदात्यास) सूचित केले जाईल.

आयआरडीएआयने विमा कंपन्यांना ऑथरायझेशन रिक्वेस्टवर  त्वरित प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला असून कॅशलेस उपचार आणि रूग्णाच्या डिस्चार्ज ह्या दोन्ही गोष्टी लवकरात लवकर करता येतील.

विमाधारकांना वरीलप्रमाणे वेळेचे बंधन सुनिश्चित करण्यासाठी कंपन्यांनी संबंधित तृतीय पक्षाच्या प्रशासकांना (Third Party Admistrators)  उचित निर्देश जारी करावे लागणार आहेत.

PDF Snap of IRDAI Press Release

https://www.irdai.gov.in/ADMINCMS/cms/frmGeneral_List.aspx?DF=PRL&mid=19

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.