KIA आणि Hyundai दोन्ही कंपन्या मिळून आणताहेत Electrical SUV

0

- Advertisement -

नवी दिल्ली: येत्या तीन वर्षांत, हुंदाई मोटर ग्रुप भारतीय बाजारात आक्रमकपणे आपल्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. याचाच एक भाग म्हणून, ह्युंदाई आणि किआ, या आघाडीच्या चारचाकी गाड्यांचे उत्पादन करणा-या कंपन्या एकत्र आल्या आहेत. येत्या वर्षी भारतीय बाजारात अनुक्रमे Ioniq 5 आणि EV6 या नावाने नवे मॉडेल्स या कंपन्या उतरवणार आहेत.

यासह ह्युंदाई कंपनीचे कोना हे मॉडेल इलेक्ट्रिक Ioniq  सेगमेंटचा भाग असू शकते आणि त्याला Ioniq 2, Ioniq 3 किंवा Ioniq 4 असे नाव दिले जाऊ शकते. मूलतः, Ioniq 5 आणि EV6 दक्षिण कोरियन कार उत्पादन कंपनीच्या पहिल्या ‘इलेक्ट्रीक व्हेईकल’ आहेत.

ह्युंदाई, ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार उत्पादक असल्याने, भारतासाठी मोठ्या प्रमाणावर ईव्हीवर काम करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांच्या जोडीला आता किया ही कंपनीही त्यांच्याबरोबर वाहन उत्पादनात सहकार्य करणार आहे. त्यातून भारतातील इलेक्ट्री वाहन उद्योगात नव्या उलाढाली होताना दिसतील.

इलेक्ट्रिक एसयूव्ही

दोन्ही कंपन्या मिळून एक इलेक्ट्रिक एसयूव्ही तयार करणार आहेत. टाटा कंपनीच्या नेक्सन या इलेक्ट्रीकल वाहनाला त्याच्याकडून तगडी स्पर्धा असेल. ह्या एसयूव्ही किंमत साधारणतः 15 लाख असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे, टाटा नेक्सन ईव्ही, ह्युंदाई आणि किआ एसयूव्हीची ह्या एका चार्जिंगमध्ये सुमारे 200 ते 220 किमीची पर्यंत धावू शकतील.

इतर इलेक्ट्रीकल वाहनांच्या तुलनेत ह्युंदाई किया या एसय़ुव्हीचा बॅटरी पॅक लहान असेल. आतापर्यंत, त्याच्याबद्दल इतर कोणताही तपशील जाहीर केला गेलेला नाही त्याशिवाय व्यावहारिकतेसाठी उच्च ग्राउंड क्लीयरन्स असणारी ही एसयुव्ही असेल.

डिझाईन आणि फीचर्सच्या दृष्टीने ह्युंदाई आणि किआ EV आणि सोनेटमध्ये काही समानता आहे का हे पाहणे मनोरंजक असेल.

टाटा कंपनीची नेक्सन ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी प्रवासी Electric Vehicle आहे, ज्याची 10,000 पेक्षा जास्त युनिट विक्री आहे,

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.