अबब ! शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप, Sensex 60 हजार अंकाला खेटला.

0

- Advertisement -

मुंबई : अमेरिकेच्या फेडरल बॅंकेने व्याजदर कमी ठेवण्याचे संकेत दिल्यानंतर गुरुवारी (23 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात अनेक बेंचमार्क इंडेक्स उच्च पातळीवर गेले. परिणामी सेन्सेक्स 1,030 अंकांनी वाढून तो जवळपास 60 हजार अंकाला खेटला आहे. दिवसभराचा व्यवहार संपला त्यावेळी बाजाराचा निर्देशांक 59,957.25 च्या विक्रमी उच्चांकावर बंद झाला.

बँकिंग, वित्तीय सेवा आणि तेल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली त्यामुळे प्रथमच सेन्सेक्स 958 अंकांनी वाढून 59,885.36 च्या उच्चांकी पातळीवर बंद झाला आणि निफ्टी 50 निर्देशांक 176 अंकांनी चढून 17,823 च्या सर्वकालीन उच्चांकावर स्थिरावला.

रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि लार्सन अँड टुब्रो हे आजचे मुंबई शेअर बाजारातील तेजीला कारणीभूत ठरलेले शेअर्स होते. त्यांनी एकत्रितपणे शेअर बाजाराच्या निर्देशांकात 750 पेक्षा जास्त गुणांचे योगदान दिले.

सेन्सेक्सचे बेस पॉईंट्स

जेव्हा सेन्सेक्स 1986 मध्ये लॉन्च झाला, तेव्हा त्याचे आधार वर्ष 1978-79 असे ठेवले गेले आणि बेस 100 पॉइंट केले गेले. जुलै 1990 मध्ये हा आकडा 1,000 अंकांवर पोहोचला. 1991 च्या आर्थिक उदारीकरणानंतर सरकारने एफडीआयचे दरवाजे उघडले आणि व्यवसाय करण्याचा कायदा बदलला. बाजारमूल्य नियंत्रणमुक्त केले गेले आणि अर्थव्यवस्था सेवाभिमुख होती. यामुळे सेन्सेक्समधील गती वाढली.

कशी राहिली आत्तापर्यंत मुंबई शेअर बाजाराची घौडदोड

मार्च 1992 मध्ये सेन्सेक्स पहिल्यांदा 4 हजारांच्या पातळीवर बंद झाला, पण त्यानंतर सेन्सेक्स 2,900 ते 4,900 दरम्यान झुलत राहिला आणि 5 हजारापर्यंत पोहोचण्यासाठी सात वर्षांहून अधिक काळ लागला.

2006 मध्ये 10 हजार

सेन्सेक्स 5 हजार ते 10 हजारांपर्यंत पोहोचण्यास 6 वर्षांहून अधिक काळ लागला. 7 फेब्रुवारी 2006 रोजी सेन्सेक्स 10,082.28 वर बंद झाला, परंतु पुढील दीड वर्षात सेन्सेक्स 10 ते 15 हजारांच्या पातळीवर पोहोचला. 9 जुलै 2007 रोजी सेन्सेक्स 15,045.73 वर बंद झाला. 2007 हे सेन्सेक्ससाठी आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष होते. पुढील सहा महिन्यांत सेन्सेक्स 20 हजारांच्या पातळीवर पोहोचला आणि डिसेंबर 2007 मध्ये सेन्सेक्सनेही 20,000 ची पातळी ओलांडली होती.

- Advertisement -

2008 च्या मंदीचा बसला होता बाजाराला फटका

8 जानेवारी 2008 रोजी सेन्सेक्सने ट्रेडिंग दरम्यान प्रथमच 21 हजारांची पातळी ओलांडली होती, परंतु त्याच वर्षी आलेल्या आंतरराष्ट्रीय मंदीचा परिणाम होऊन संपूर्ण जगाच्या शेअर बाजारांसह भारतीय शेअर बाजारही कोसळला आणि 10 जानेवारी 2008 रोजी सेन्सेक्स 14,889.25 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वर्षी 16 जुलै रोजी सेन्सेक्स 12,575.8 वर बंद झाला. एवढेच नव्हे तर नोव्हेंबर 2008 मध्ये सेन्सेक्सने 8,451.01 ची पातळी गाठली होती. यानंतर सेन्सेक्सला 21 हजारांच्या पातळीवर परत जायला सुमारे 3 वर्षे लागली.

त्यानंतर 2013 मध्ये, बीएसई सेन्सेक्स पुन्हा वाढला आणि 18 जानेवारी 2013 रोजी सेन्सेक्स पुन्हा 20,039.04 वर बंद झाला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाले. शेअर बाजारानेही मोदी सरकारचे जोरदार स्वागत केले. 16 मे 2014 रोजी सेन्सेक्स 25,364 च्या पातळीवर पोहोचला होता. यानंतर सेन्सेक्स 25 हजार ते 30 हजारांपर्यंत पोहोचण्यास तीन वर्षे लागली.

एप्रिल 2017 मध्ये सेन्सेक्स 30,133 वर पोहोचला आणि पुढच्या एका वर्षातच सेन्सेक्स 35 हजारांच्या पातळीवर पोहोचला. 17 जानेवारी 2018 रोजी सेन्सेक्स 35,081 वर बंद झाला. 30 ऑक्टोबर 2019 रोजी सेन्सेक्सने 40,051 ची पातळी गाठली.

जानेवारी 2020 मध्ये सेन्सेक्स 42 हजारांच्या जवळ पोहोचला होता, पण त्यानंतर वर्ष 2020 च्या कोरोनामुळे कहर होऊ लागला. आणि हेच कारण होते की मार्च 2020 मध्ये लॉकडाऊननंतर सेन्सेक्स 25,981 पर्यंत पोहोचला, जरी एप्रिल आणि मेच्या अखेरीस सेन्सेक्स पुन्हा सावरायला लागला.

2020 नंतर तेजी कायमच

30 ऑक्टोबर 2019 रोजी सेन्सेक्स प्रथमच 40,000 च्या वर बंद झाला. परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या आधारावर सेन्सेक्सने सुमारे एका वर्षात 40 ते 45 हजारांचा प्रवास केला आहे. 4 डिसेंबर 2020 रोजी सेन्सेक्स 45,079 वर बंद झाला. यानंतर सुमारे दीड महिन्यानंतर सेन्सेक्सने 50 हजारांचा टप्पा ओलांडला.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.