Ola-e scooter झाली भारतामध्ये लाँच, जाणून घ्या कोणते असणार नवीन फिचर

0

- Advertisement -

Ola कंपनीने आपली पहिली इलेक्टरीक स्कुटर भारतामध्ये लाँच केली आहे. यामध्ये दोन प्रकारचे मॉडेल असतील S1 आणि S1 प्रो . सध्या ही गाडी खरेदी करण्यासाठी सबसिडी देखील उपलब्ध आहे. Ola च्या येण्याने याअगोदर आलेल्या बजाज यांची चेतक , इथर एनर्जी ची 450X , TVS ची I3 यांच्यामध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळू शकते. इतर कंपनीच्या तुलनेत Ola ची स्कुटर ही तुलनेने स्वस्त असल्याने बऱ्यापैकी ग्राहक इकडे वळू शकतात. Ola-e scooter ची बुकिंग ८ सप्टेंबर पासून सुरू होऊ शकते आणि डिलीव्हरी ही ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होऊ शकेल अशी माहिती कंपनीचे फाउंडर भावेश अग्रवाल यांनी दिली आहे.

कोण-कोणते असणार नवीन फिचर

१) एकदा चार्ज केल्यावर जाता येईल 181 किमी पर्यंत

Ola ने S1 स्कुटर मध्ये 8.5 किलोवॅट पीक पावर निर्माण करणारी मोटर बसवली आहे. या मोटारीला 3.9 किलोवॅट कॅपासीटी ची बॅटरी जोडली आहे. या गाडीची सर्वाधिक स्पीड 115 किमी प्रति तास आहे, सिंगल चार्जे मध्ये ही गाडी 181 किमी पर्यंत जाऊ शकते.

२) 6 तासात बॅटरी होईल चार्जे

स्कुटर बरोबर कंपनी 750 वॅट चा पोर्टबल चार्जेर देणार आहे. ज्याच्या सहाय्याने तुम्ही बॅटरी चार्जे करू शकाल. Ola ने काही ठराविक ठिकाणी चार्जिंग पॉईंट उभारले आहेत. तिथे 18 मिनिट मध्ये तुमची 50% बॅटरी चार्जे होऊ शकते.

३) गाडीमध्ये रिव्हर्स मोडचा पर्याय ही असणार

आपण चारचाकी वाहनाला रिव्हर्स मोड असल्याचे पाहतो परंतु आता Ola ने या इलेक्टरीक बाईक ला ही रिव्हर्स चा पर्याय दिला आहे. ज्यामुळे तुम्हाला पार्किंगमध्ये गाडी लावायला सोफे जाऊ शकत. क्रुज कंट्रोल मुळे तुम्ही गाडी एका ठराविक स्पीड मध्ये चालवू शकाल. कंपनीने या गाडीला डिस्क ब्रेक देखील दिला आहे.

- Advertisement -

४) स्कुटर ला असणार 7 इंच चा डिसप्ले

स्कुटर ला टचस्क्रिन डिसप्ले असणार आहे आणि तो वाटरप्रूफ तसेच डस्टप्रूफ असणार आहे. यांच्यामध्ये ऑक्टोकोर प्रोसेसर आणि 3gb रॅम चा सेट देण्यात आला आहे. जो 4G, wi-fi आणि ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी ला सपोर्ट करेल.

५) तुमच्या इच्छेनुसार स्पीडलिमिट ठेवता येणार

डॅशबोर्ड ला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदलू शकाल. यामध्ये नेव्हिगेशन, स्पिडोमीटर, म्युजिक यासारख्या गोष्टींचा वापर करता येणार. तसेच तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी ठराविक स्पीड फिक्स करू शकता.

६) व्हॉइस कमांड चा ऑप्शन ही असेल उपलब्ध

व्हाईस कमांड ने तुम्ही गाडीच्या ठराविक गोष्टींच्यावर ताबा मिळवू शकता. Hi ओला प्ले म्युजिक म्हणताच तुम्ही संगीत ऐकू शकाल, चेंज सॉंग म्हटल्यानंतर गाणे बदलले जाईल.

गाडीच्या S1 या मॉडेल ची किंमत 99,999 असेल तर S1 प्रो या मॉडेल ची किंमत 1,29,999 रुपये इतकी असणार आहे. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात मध्ये यांच्या किमती या वेगवेगळ्या असणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा. किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.