आश्चर्यकारक: आता टु व्हिलर ही चालणार रिव्हर्स गेअरमध्ये, पहा व्हिडीओ कोणती, स्वातंत्र्यदिना पासून वितरणास होणार सुरवात

0

- Advertisement -

नवी दिल्ली: आपण दुचाकी फक्त पुढेच चालवत होतो परंतु आता ओला (Ola Electric Scooter) घेऊन येत असलेल्या इलेक्ट्रीक स्कूटर मध्ये असे नवे फिचर आहे की स्कूटर चक्क रिव्हर्स मोड मध्ये चालते. आहे ना आश्चर्यकारक.

भारतातील ओला कंपनीचे कार्यकारी संचालक आतिश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर वर या इलेक्ट्रीक स्कूटरचा रिव्हर्स मोड मध्ये चालविला जात असलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी हवामान बदलाला रिव्हर्स करण्यासाठी एक नव्या क्रांतीसह 15 ऑगस्ट ला भेटू olaelectric.com वर असा उल्लेख केला आहे.

Ola Elctric नेही केलेल्या एका ट्विटममध्ये लिहीले आहे की, आपण ओला स्कूटर वेगात रिव्हर्स करीत चालवू शकता. आपल्याला ओला स्कूटर रु. 499 मघ्ये बुक करता येईल.

 

ओला इलेक्ट्रीक या कंपनीची नवी स्कूटर ही इलेक्ट्री स्कूटर श्रेणीतील फर्स्ट आणि सेगमेंट मधील बेस्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या स्कूटरला चावी नसणार असून ती स्मार्टफोन वरील एका अप्लिकेशनच्या मदतीने स्टार्ट करता येईल ज्यामुळे वापरकर्त्याला कि लेस एक्सपिरीएन्स घेता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

- Advertisement -

तसेच इलेक्ट्रीक स्कूटरच्या श्रेणीतील अनेक गाड्यांपेक्षा ह्यात सामान ठेवण्यासाठीही जास्त जागा असेल.

येत्या 15 ऑगस्ट पासून या इलेक्ट्रीक स्कूटरचे वितरण सुरु होणार असून तेव्हाच या स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंजचा खुलासाही होईल. ही स्कूटर 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते आणि 50 टक्के चार्जिंग द्वारे स्कूटर 75 किलोमीटर पर्यंत जाते असा कंपनीने दावा केला आहे.

स्कूटरच्या बुकिंग सुरु असून इच्छूक खरेदीदार 499 रुपयांत बुकिंग करू शकतात. कंपनीने बुकिंग सुरु केल्यापासून 24 तासांत 1 लाख लोकांनी स्कूटर बुक केली असल्याचे म्हटले आहे.

या स्कूटरचीच्या S-series ची किंमत 80 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत असेल.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.