लक्षात असू द्यात..NEFT पेमेंटसुविधा या दिवशी राहणार बंद..

0

- Advertisement -

कोरोनाच्या संकंटकाळात अनेक जणांना ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करून आपले व्यावसायिक आर्थिक व्यवहार करण्यास या भरपूर मदत झाली आहे. परंतु या सुविधांचा वापर अलिकडील काळात वाढत असल्याने या सुविधांना वारंवार तांत्रिक दृष्ट्या अद्ययावत (Update) करणे आवश्यक असते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक अधिसूचना जारी केली असून त्यानुसार एनईएफटी सुविधेची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने त्याचे तांत्रिक अद्ययावतीकरण करणे प्रस्तावित असून 22 मे या दिवशी दैनंदिन व्यवहार संपल्यानंतर झाल्यानंतर राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) सुविधा पुढील 14 तास उपलब्ध राहणार नाही.

त्यामुळे शनिवारी (22 मे) रात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी (23 मे) दुपारी 3 वाजेपर्यंत एनईएफटी सेवा ही तात्पुरत्या स्वरुपात बंद केली जाणार आहे. असे आरबीआयने अधिसूचनेत नमूद केले आहे.

मात्र या कालावधीत रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा नेहमीप्रमाणे सुरु राहणार असल्याचे आरबीआयच्या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. आरबीआयने आरटीजीएससाठी तत्सम तांत्रिक अद्ययावतीकरण (Up-gradation) गेल्या एप्रिल महीन्यातील 18 तारखेस पूर्ण केले होते.

- Advertisement -

आरबीआयने सदस्य बँकांना आपल्या ग्राहकांना ही माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या नियोजित आर्थिक व्यवहाराच्या पेमेंट प्रक्रियांच्या बाबतीत नियोजन करता येईल.

देशाभरात ऑनलाईन आर्थिव व्यवहार करण्यासाठी एनईएफटी (National Electronic Funds Tranfer) आणि आरटीजीएस (Real Time Gross Sttelment) ह्या ऱिझर्व्ह बॅंकेच्या मालकीच्या केंद्रीकृत सुविधांद्वारे पैसे अदा करून व्यवहार पुर्ण करता येतात. त्या रिझर्व्ह बॅंकेद्वारेच संचलित केल्य जातात.

आरटीजीएस ही मोठ्या-मूल्य असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या त्वरित निधी हस्तांतरणासाठी; तर एनईएफटी ही छोट्या व्यवहारांसाठी लोकप्रिय पेमेंट सुविधा आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.