Reliance ला सर्वोच्च न्यायालयाचा झटका: Amazon च्या बाजूने दिला निकाल

0

- Advertisement -

नवी दिल्ली: रिलायन्स (Reliance Retail) आणि किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसायातील फ्यूचर ग्रुपमध्ये (Future Gruop) झालेला करार सुप्रीम कोर्टाने अमान्य केल्याने मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीला मोठा झटका बसला आहे. तसेच याबाबत निर्णय देताना सिंगापूरमधील लवादाने दिलेला निकालही भारतात सुद्धा लागू होईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

या निकालामुळे अमेझॉन (Amazon) कंपनीला मोठा दिलासा मिळाला असून ऑगस्ट 2019 पासून सुरु झालेला विवाद आता संपुष्टात आला आहे.

रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल (Reliance Retail)आणि किशोर बियाणी (Kishor Biyani) यांचा फ्यूचर ग्रुफमध्ये (Future Gruop) 24 हजार 713 कोटी रुपयांत डील (Reliance-Future Deal) झाली होती. परंतु, रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये झालेल्या या व्यावसायिक व्यवहारावर अमेझॉनने आक्षेप घेतला होता.

रिलायन्स रिटेल आणि फ्यूचर ग्रुफमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या प्रस्तावित डीलवरून निर्माण झालेल्या वाद प्रकरणी 29 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. तो आज 6 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत जाहीर केला आहे. त्याचबरोबर इमरजेन्सी आर्बिट्रेटरचा ( Emergency Arbitrator) निर्णय लागू करणं योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने या निकालात म्हटले आहे.

केव्हा पासून सुरु झाला होता विवाद –

ऑगस्ट 2019 – अमेझॉनने फ्युचर समुहाचे प्रवर्तक फ्युचर कुपन यांच्याकडून 49 टक्क्यांची भागीदारी करण्यासाठी 1500 कोटी रुपयांचा करार केला.

डिसेंबर 2019 – फ्युचर कुपन समुहाला अमेझॉनकडून 1500 कोटी रुपये दिले गेले.

ऑगस्ट 2020 – फ्युचर रिटेल व्यवस्थापकीय मंडळाकडून रिलायन्स रिटेल कंपनीसोबतच्या रिटेल, होलसेल आणि लॉजिस्टिक व्यवसायासाठी 24 हजार 719 कोटी रुपयांच्या कराराला मंजूरी,

आक्टोबर 2020 – अमेझॉनने फ्युचर रिटेल आणि रिलायन्स रिटेल यांच्यात झालेल्या कराराला सिंगापूर आर्बिट्रेशन सेंटरमध्ये याचिका

- Advertisement -

25 आक्टोबर 2020 – सिंगापूर इमरजेन्सी आर्बिट्रेटरची फ्युचर रिटेल आणि रिलायन्स रिटेल यांच्यात झालेल्या कराराला स्थगिती

नोव्हेंबर 2020 – फ्युचर रिटेल समुहाने रिलायन्स बरोबरच्या करारात अमेझॉनच्या हस्तक्षेपाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका,

डिसेंबर 2020 – दिल्ली उच्च न्यायालयाने फ्युचर रिटेल कंपनीच्या व्यवस्थापनाच्या रिलायन्स सोबत करार करण्याच्या निर्णयाला योग्य ठरवले, तसेच अमेझॉनचा दावाही योग्य असल्याचे स्पष्ट करीत अपिल करण्यासही परवानगी

जानेवारी 2021 – सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणीसाठी 3 सदस्यीय नेमणूक, दरम्यान SEBI ची फ्युचर रिटेल आणि रिलायन्सच्या कराराला मंजूरी

फेब्रुवारी 2021 – दिल्ली उच्च न्यायालयाची फ्युचर रिटेल आणि रिलायन्सच्या कराराला स्थगिती

मार्च 2021 – अमेझॉनने कराराविरोधात केलेल्या याचिकेवर एप्रिल अखेर सुनावणी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, प्रत्यक्षात 20 जुलै रोजी सुनावणी सुरु

29 जुलै 2021 – सर्वोच्च न्यायालयाने फ्युचर रिटेलच्या विक्री संबंधातील कराराला विरोध करणा-या अमेझॉनच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.