SBI शाखांतून रोख पैसे काढण्यासाठी ग्राहकांना दिलासा, नियमांत केले बदल

0

- Advertisement -

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठ्या बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने (SBI) काही दिवसांपुर्वीच त्याच्या ग्राहकांसाठी एटीएम मधून पैसे काढण्यासाठीचे काही नियम बदलले होते. परंतु आता एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. चेक किंवा विड्राअल स्लीपद्वारे पैसे काढण्याच्या नियमांतही काही बदल केले आहेत. एसबीआयने ट्विट करून यासंदर्भात माहीती दिली आहे.

आता एसबीआय ग्राहकांना त्यांच्या मूळ शाखेच्या व्यतिरीक्तच्या (Non Home Branch) शाखेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्यात आली आहे. आता ग्राहकांच्या सुविधेसाठी त्यांना आता त्यांच्या मूळ शाखेव्यतिरीक्तही बचत खात्यातून चेक वा विड्राअल स्लीपद्वारे पैसे काढता येतील. एसबीआयने 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बॅंकेच्या नियमानुसार Home Branch म्हणजे ग्राहकाने आपले खाते ज्या शाखेत उघडले आहे त्या शाखेला मूळ शाखा म्हणतात. तर त्याव्यतिरीक्तच्या शाखांना Non Home Branch म्हणतात.

नव्या नियमानुसार आता नॉन-होम ब्रँचमधून स्वतःसाठी रोख (Self Cash) पैसे काढण्याची मर्यादा 25 हजार रुपये करण्यात आली आहे. पैसे काढण्यासाठी विड्राअल स्लीपच्या मदतीने ही पैसे काढले जाऊ शकतात.

- Advertisement -

तसेच धनादेशांच्या (चेक) मदतीने नॉन-होम शाखेतून स्वत: चे पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 1 लाख करण्यात आली.

तसेच थर्ड पार्टीकडून रोख पैसे काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली आहे. परंतु हा व्यवहार विड्रॉल स्लीपच्या मदतीने करता येणार नाही तर फक्त धनादेशाद्वारे करता येईल.. त्याशिवाय थर्ड पार्टी व्यवहारासाठी केवायसी कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.