ऑक्सिजन पुरवठ्यासाठी टाटा समुहाचा पुढाकार

0

- Advertisement -

मुंबई : करोना साथीची दुसरी लाट थोपविण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न होत असतानाच काल पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांनी मिळून लढण्याच्या आवाहानाला प्रतिसाद देत भारतातील सर्वात मोठा टाटा उद्योग समुहाने सुद्धा या लढ्यात आपले योगदान देत असल्याचे जाहीर केले आहे. सद्य स्थितीत निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी टाटा समूहाने पुढाकार घेतला आहे.

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी टाटा समूह चार्टर्ड फ्लाईट्सने क्रायोजेनिक कंटेनर आयात करणार आहे. टाटा समूह चार्टर्ड फ्लाईट्सने २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करणार आहे. यातून ऑक्सिजनचा पुरवठा देशभरातील कोव्हीड सेंटर आणि रुग्णालयाना करणे सोपे होणार आहे. याबाबत टाटा समूहाने ट्विट करून माहिती दिली आहे.

 

- Advertisement -

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात असून हा टास्क फोर्स वैद्यकीय क्षेत्राची मागणी आणि त्याची पूर्तता करण्यावर देखरेख करेल, असे टाटा समूहाने म्हटलं आहे. गेल्या वर्षीही टाटा समूहाने करोना रिलीफ फंडासाठी १५०० कोटींचे योगदान दिले होते. तसेच मुंबई आणि इतर शहरांमध्ये टाटा समूहाने पंचतारांकित हॉटेल्स करोनाबाधितांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून उपलब्ध करून दिली होती.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.