भारतात लवकरच उपग्रह इंटरनेट सेवा, इलॉन मस्क यांना टक्कर देणार एअरटेल आणि टाटा समुह

0

- Advertisement -

नवी दिल्ली: सध्या इंटरनेटची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जगातील सर्व देशांत इंटरनेट सेवा वापरण्याच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तरीही भारतातील ग्रामीण भाग आणि डोंगरी क्षेत्रात अजून पाहिजे तशी सेवा पुरविण्यात अनेक टेलिकॉम कंपन्यांना यश आलेले नाही. मात्र आता त्यावरील तोडगा दृष्टीक्षेपात आहे.

आता भारतात सॅटेलाईट इंटरनेट सुविधा नजिकच्या भविष्यात सुरु होते आहे. अमेरीकेतील प्रसिद्ध उद्योगपती Elon Musk यांनी त्यांच्या starlink या सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीच्या माध्यमातून भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. नव्हे ते त्यासाठी भारतातील ग्राहकांकडून आगाऊ बुकिंगपण करून घेत आहेत.

नव्या सॅटेलाईट तंत्रज्ञानावर आधारित अशी ही इंटरनेट सेवा सुविधा पुरविण्यात भारतीय कंपन्याही मागे नाहीत. भारती एअरटेलने या आधीच आपली One Web नावाने सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्याची घोषणा केली असून युरोपातील काही कंपन्यांबरोबर याबाबतीत करार देखील  केला आहे.

आता इलॉन मस्क यांच्या starlink आणि Airtel च्या One web या सेवांना टक्कर देण्यासाठी भारतातील प्रसिद्ध TATA उद्योग समुहानेही Nelco नावाने आपली सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी टाटा कंपनीने कॅनडातील Telsat या कंपनीबरोबर करार केला आहे.

काय आहे सॅटेलाईट इंटरनेट सुविधा

- Advertisement -

सध्या पुरविण्यात येणा-या इंटरनेट सुविधा ह्या केबल द्वारे वा फायबर ऑप्टीक्स केबल द्वारे पुरविल्या जातात. सॅटेलाईट इंटरनेट सुविधा ही पृथ्वीच्या जवळील कक्षेत (Lower orbits) उपग्रह सोडून ते ऐकमेकांशी जोडून इंटरनेट वापरासाठी Bandwidth उपलब्ध करून देणार आहेत. अशा उपग्रहांच्या वापरामुळे  इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीची समस्या संपेल आणि वेगही कमालीचा वाढेल आणि डोंगरद-्यातूनही आणि अतिदुरच्या क्षेत्रातही इंटरनेट सुविधा सहज वापराता येणार आहे.

कधी पासून मिळणार सेवा 

भारती एअरटेल कंपनीच्या One Web आणि इलॉन मस्क यांच्या Starlink या कंपनीच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवा 2022 च्या म्हणजेच पुढील वर्षीच्या मे महिन्यांपासून उपलब्ध होण्याीच शक्यता असून टाटा समुहाच्या सेवा सुरु होण्यास मात्र 2024 पर्यंत वाट बघावी लागण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.