फेसबुक, व्हॅाट्स अपची याचिका कोर्टाने फेटाळली…..

गोपनीयता धोरणाची चौकशी करण्याचा सीसीआयचा होता आदेश

0

- Advertisement -

नवी दिल्ली: फेसबुक आणि व्हॅाट्स अप या दोन्ही सामाजिक माध्यमांनी आपल्या गोपनीयता धोरणात (प्रायव्हसी पॅालिसी) नव्याने करण्यात येणा-या बदलाची चौकशी करण्याचे आदेश भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) दिले होते. परंतु त्या आदेशाला फेसबुक आणि व्हॅाट्स अप यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. गुरुवारी न्यायमुर्ती नवीन चावला यांच्या एक सदस्यीय पीठाने स्पर्धा आयोगाच्या आदेशाविरूद्ध फेसबुक आणि व्हॅाट्स अपची याचिका फेटाळून लावली आहे.

स्पर्धात्मक वातावरणात गोपनीयता धोरण नेमके काय आहे याची चौकशी करण्याचे आदेश भारतीय स्पर्धा आयोगाने दिले होते. त्यास व्हॅाट्स अपने आव्हान दिल्यानंतर याचिकेत कोणतीही गुणवत्ता आढळली नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने आयोगाच्या चौकशी आदेश रद्द करण्यास नकार दिला आहे.

 

- Advertisement -

दरम्यान तसेच सर्वोच्च न्यायालयात या संबंधात आणखी एक खटला प्रलंबित असल्याचे व्हॅाट्स अप तर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी निदर्शनास आणून दिले परंतु त्याचा निकाल येईपर्यंत आयोगाच्या चौकशी आदेशास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

भारतीय स्पर्धा आयोगाने व्हॅाट्स अप च्या नव्या गोपनीयता धोरणामुळे हे वापरकर्त्याचा अतिरेकी डेटा संकलन होण्याची शक्यता आहे. तसेच त्या डेटाचा वापर करून मक्तेदारी निर्माण होऊ शकते, त्यामुऴे बाजारात नैसर्गिक स्पर्धा तत्वाच्या संदर्भात याची चौकशी करण्याची गरज असल्याने आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.