देशातील सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क: ZEE आणि SONY PICTURES चे झाले विलिनीकरण

0

- Advertisement -

नवी दिल्ली : झी एंटरटेनमेंट ही आघाडीची मनोरंजन कंपनी आता सोनी पिक्चर्समध्ये विलीन होणार आहे. विलीनीकरणानंतर तयार झालेल्या नवीन संस्थेमध्ये झी एंटरटेनमेंटचे प्रवर्तक एस्सेल ग्रुपला 2% हिस्सा मिळेल. झी एंटरटेनमेंटचे एमडी आणि सीईओ पुनीत गोएंका यांनी एका निवेदनात ही माहिती दिली आहे. विलीनीकरणाच्या प्रस्तावाला अद्याप ZEE च्या सार्वजनिक भागधारकांनी मंजुरी देणे बाकी आहे.

ZEE आणि सोनी यांनी विलीनीकरणासाठी गैर-स्पर्धात्मक करार केला आहे. सध्या, एस्सेल ग्रुपचा ZEE एंटरटेनमेंटमध्ये 3.44% हिस्सा आहे. तथापि, प्रस्तावित विलीनीकरणानंतर हे प्रमाण कमी होईल. विलीनीकरण कराराअंतर्गत, सोनी पिक्चर्स नवीन कंपनीमध्ये 52.93 टक्के भागभांडवल धारण करेल आणि नंतर 2% हिस्सा एस्सेल ग्रुपला हस्तांतरित करेल.

अशाप्रकारे, सोनीचा नवीन कंपनीत 51% हिस्सा असेल, तर झी एंटरटेनमेंटचे भागधारक नवीन कंपनीत 47.07% भागभांडवल ठेवतील.

पुनीन गोएंका पुढील पाच वर्षांसाठी विलीनीकरणानंतर कंपनीचे एमडी आणि सीईओ असतील. विलीनीकरणानंतर, सोनी समूहाला नवीन कंपनीमध्ये बहुसंख्य संचालकाची नियुक्ती करण्याचा अधिकार असेल.

- Advertisement -

दरम्यान सोनी पिक्चर्स इंडियामध्ये विलीनीकरणाचा परिणाम म्हणून झी एंटरटेनमेंटचे शेअर्स 39% वाढले आहेत.

या विलीनीकरण कराराअंतर्गत, झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स दोघेही त्यांचे संबंधित लाइनर नेटवर्क, डिजिटल मालमत्ता, उत्पादन व्यवसाय आणि प्रोग्राम लायब्ररी यांचे विलीनीकरण करतील.

दोन्ही कंपन्यांच्या विलिकरणात 70 हून अधिक टीव्ही चॅनेल, दोन व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा (झी 5 आणि सोनी लाईव्ह) आणि दोन चित्रपट स्टुडिओ (झी स्टुडिओ आणि सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया) असतील. त्यामुळे हे देशातील सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क तयार होणार आहे. भारतीय बाजारात त्याचे जवळचे प्रतिस्पर्धी स्टार आणि डिस्ने आहेत.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.