प्रेयसीने लावला लग्नाचा तगादा, प्रियकराने केली इंजेक्शन देऊन हत्या

0

- Advertisement -

मुंबई: नवी मुंबईत एका व्यक्तीने प्रेयसीची  केटामाईन इंजेक्शन देऊन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीची प्रेयसी  गंभीर आजाराने ग्रस्त असल्याने तो तिच्याशी लग्न करू इच्छित नव्हता. त्याने आजाराच्या उपचारच्या बहाण्याने तिला केटामाईन इंजेक्शन देऊन तिची हत्या केली अशी कबुली आरोपीने स्वतः पोलिसांनी दिली आहे.

पनवेल पोलिस ठाण्यातील पोलिसांना 29 मे रोजी नियोजित नवीन विमानतळाच्या जागी एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला होता.

अशी पटली मृतदेहाची ओळख

मृतदेहाजवळ जवळ कोणतेही ओळखपत्र किंवा इतर कागदपत्र नव्हते त्यामुळे सुरूवातीला तरुणीची ओळख पटविता आली नाही. मात्र, 30 मे रोजी एक रिक्षा चालकाल एक प्लॅस्टिकची पिशवी सापडली त्यात आधार कार्ड, पर्स आणि महिलेचे कपडे होते. त्याने ती पिशवी पोलिस ठाण्यात जमा केली. काही दिवसांनंतर तरुणीचा भाऊ पोलिस ठाण्यात आला आणि त्याने रिक्षाचालकाला सापडलेल्या पिशवतील सामान त्याच्या बहिणीचे असल्याची पुष्टी केली.

- Advertisement -

गुन्हा असा समोर आला

तरुणीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, तिच्या बहिणीचे चंद्रकांत गायकर या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आणि तो दवाखान्यात काम करत असे. मृतकाच्या भावाने दावा केला की त्याने तिच्या बहिणीला फोनवर चंद्रकांत गायकर सोबत भांडण करताना ऐकले होते. या आधारावर पोलिसांनी चंद्रकांत गायकर याला पकडून चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला.

आरोपीने सांगितले की, तरूणीशी त्याचे जवळपास 6 महिने प्रेमसंबंध होते. तिला कोणता तरी गंभीर आजार होता आणि ती त्याला नेहमी लग्नासाठी आग्रह करत असे. यमुले संतप्त आरोपीने तिचा काटा काढण्याचची योजना बनवायला सुरुवात केली. आरोपीने सांगितले की त्याने तिच्यावर उपचार करायच्या बहाण्याने तिला केटामाईन इंजेक्शन दिले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर त्याने हे रहस्य लपवण्यासाठी मुलीचा मोबाईल आणि पर्स नष्ट केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले, तेथून त्याला 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.