देशद्रोह प्रकरणी कंगणा राणावतच्या अडचणीत वाढ, मुंबई उच्च न्यायालय करणार ‘या’ दिवशी सुनावणी

0

- Advertisement -

मुंबई: बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणावत तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती केवळ बॉलीवुड मध्येच घडणार्‍या प्रकरणावर बोलते असं नाही, ती बेधडकपण राजकीय मुद्द्यांवरही तिचे मत व्यक्त करत असते. सध्या कंगनाविरोधात भडकाऊ ट्विट केल्याप्रकरणी देशद्रोहाचा खटला सुरू आहे. मुंबई पोलिसांनी कंगनाविरोधात ही कारवाई केली आहे.

पुढील सुनावणीची तारीख 13 सप्टेंबर

मुंबई पोलिसांनी दाखल केलेला देशद्रोहाचा खटला रद्द करण्यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारी त्याच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने पुढील तारीख 13 सप्टेंबर दिली.

दोन समाजात तेढ निर्माण करणारे ट्विट केले होते

कंगना राणावतने अगदी भडकाऊ स्वरात ट्विट केले होते. कंगनाने शेतकरी आंदोलनावरही भडकाऊ ट्विट केले होते. कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर मुनावर अली सय्यद यांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या ट्विट आणि वक्तव्यांचा संदर्भ देत मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता, परंतु वांद्रे दंडाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी कंगनाविरोधात गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

खालील कलमान्वये दाखल झाला गुन्हा

मुंबई पोलिसांकडून 17 ऑक्टोबर 2020 रोजी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात दोन समाजांमध्ये वाद निर्माण करणे आणि सामाजिक द्वेष वाढवणे, कलाकारांचे धर्मानुसार विभाजन केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली. त्यांच्याच्याविरुद्ध कलम 153A (विविध धार्मिक, वांशिक गटांमध्ये द्वेष वाढवणे), कलम 295A (जाणूनबुजून धार्मिक भावना भडकवणे) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 124A (राजद्रोह) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी कंगनाला तिचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी अनेक नोटिसा दिल्या होत्या, पण कंगना तिचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहिली नाही. त्यानंतर अटक टाळण्यासाठी अभिनेत्रीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना अटकेपासून सुरक्षा देत मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही अभिनेत्रींना 8 जानेवारी 2021 रोजी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.