इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी बलात्कार

0

- Advertisement -

मुंबई: सध्याच्या डिजिटल युगात जवळपास सर्व किशोरवयीन मुले आणि मुली स्मार्टफोन वापरत आहेत. इंटरनेट स्वसत असल्याने त्यांच्याकडे डाटा पॅक ही असतो. त्यामुळे मुलांचा ऑनलाइन समाज माध्यमांवर वेळ घालवणे वाढले आहे. त्यावर अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री करणे, ओळख वाढवणे इत्यादि घटना होताच असतात. मात्र, काही समाजकंटक या गोष्टीचा गैरवापर करून अल्पवयीन मुला-मुलींना फसवण्याचे काम करतात.

अशीच एक संतापजनक घटना मुंबईमध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या इन्स्टाग्रामवरील मित्रांनी एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घटना 31 मे आणि 1 जून दरम्यानच्या रात्री घडली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली असून दोघे अजूनही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित मुलीचे वय फक्त 16 वर्ष असून, ती बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यासाठी कुटुंबीय मालाड पाशकिम पोलिस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याने तत्काळ अपहारणाचा गुन्हा दाखल करत मुलीचा शोध सुरू केला. त्याच्च दिवशी दुपारी उशिरा मुलगी स्वतःच घरी परतली. ती घाबरलेल्या अवस्थेत दिसत असल्याने कुटुंबिय चितेत होते. तिच्या पालकांनी ती कुठे गेली होती? काय झाले ? असे प्रश्न विचारल्यावरही मुलगी गप्पच होती. तिने घाबरून त्यांना काहीच सांगितले नाही. पोलिसांत गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे तिच्या पालकांनी मुलगी घरी परत आल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर एका महिला पोलिसाने तिला विश्वासाठ घेऊन शांत केल्यावर मुलीने त्यांना घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.

नेमकं काय घडलं त्या रात्री

- Advertisement -

पोलिस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे इन्स्टाग्रामवर काही मित्र होते. त्यापैकी एकाने त्याच्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्याने मुलीलाही पार्टीला आमंत्रित केले होते. ते सर्व मढ परिसरातील हॉटेल बाहेर भेटले. तेथे त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला. ते गाडीने घटनास्थळी पोहोचले. गाडीत केक ठेवून वाढदिवस साजरा केला.

तिथे वाढदिवस साजरा केल्यानंतर मुलीच्या दोन इन्स्टाग्राम मित्रांनी तिला गाडीच्या आत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलगी तिथून निघून गेली आणि मालाड भागात एका मित्राच्या घरी गेली. पण इथेही एका मित्राने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर ती कशीतरी घराबाहेर पडली. पण ती पुन्हा घरी न जाता  ती दुसर्‍या मित्राच्या घरी गेली. इथे पुन्हा एका मित्राने तिच्यावर बलात्कार केला.

वरील प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी 18 ते 23 वयोगटांतील 4 मुलांनी त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्या चौघाना पोलिसांनी अटक केलेआहे.  यासोबतच बलात्कार न करणार्‍या पण ही घटना पाहणार्‍या दोघाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. ते दोघे अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.