पत्नी पसंत नसणे हे हत्येच्या कटाचा पुरावा असू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने आरोपी पतीला केले मुक्त

0

- Advertisement -

दोन दशकांपूर्वी पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरूंगात असलेल्या पती व त्याच्या भावाची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.  गुन्ह्याकडे पाहण्यासाठी एकसमान किंवा सार्वभौम दृष्टिकोन असू शकत नाही. तसेच निकाल गृहितकावर आधारित नसावेत, असेही सर्वोच्च न्यायलयाने म्हटले आहे.

अलाहाबाद कोर्टाचा निर्णय केला रद्द

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ पत्नी न आवडण्यामुळेच तिचा खून करण्याचा कट रचण्याचे सिद्धांत अत्यंत चुकीचा आहे. सर्व आरोपींचे मत आणि हेतू समान असल्याचे सिद्ध करणारे पुरावे सादर करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला आहे. न्यायमूर्ती आर.एफ. नरिमन, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने सुरेन्द्र कुमार (मृताचे दीर) आणि रणवीर (मृताचा नवरा) यांना पत्नी कमलाच्या हत्येचा दोषी ठरवलेला अलाहाबाद कोर्टाचा निर्णय रद्द केला आहे.

कोर्टाने काय म्हटले?

- Advertisement -

रणविर आपल्या पत्नीपासून खुश नव्हते, असे असू शकते परंतु याचा अर्थ असा होत नाही की त्याने त्याचा भाऊ सुरेन्द्र आणि वडील ओमप्रकाश यांच्यासोबत मिळून कमलाराणीची हत्या करण्याचा कट रचला होता.

फिर्यादी पक्षाचे काय होते म्हणणे?

फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, 8 ऑगस्ट 1993 रोजी काही दिवस माहेरात राहून कमलादेवी तिचा दीर सुरेन्द्रसोबत स्कूटरने परतत होती. रस्त्यात 2 सशस्त्र गुंडांसोबत बाचाबाची झाल्यानंतर त्या गुंडांनी तिला शेतात नेऊन तिची गोळी मारून हत्या केली व तिचे दागिने लुटले.

पोसिसांकडील एफआयआर मध्ये सासरच्या लोकांवर कमलराणी सोबत दुर्व्यवहार करण्याचा आरोप लावण्यात आला होता. त्याच्या आधारावर सासरच्या लोकांना अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.