हुंड्यासाठी सासरच्यांनी दिला त्रास, घरच्यांना जखमांचे फोटो पाठवून महिलेने दिले प्राण

0

- Advertisement -

केरळ: अजूनही समाजात हुंड्यासारख्या अनिष्ट रूढी सुरूच आहेत. देशात अजूनही हजारो महिलांना हुंड्यासाठी त्रास दिला जातो. परिणामी त्रासाला कंटाळून अनेक महिला स्वतःचे प्राण घेतात. अशीच एक घटना देशातील सर्वात साक्षर राज्य केरळमध्ये घडली आहे.

केरळमध्ये हुंड्यासाठी होणार्‍या छळाला कंटाळून 24 वर्षीय विस्मया नायर या तरुणीने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे तिचे आईवडील फार दुखी असून, जावयावर चिडून आहेत. त्यांची मुलगी एवढ्या त्रासात असेल, याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती.

आयुर्वेदाचे शिक्षण घेणार्‍या विस्मयाचे एका सरकारी अधिकारी किरण कुमार सोबत लग्न झाले होते. आपल्या कुवतीनुसार तिच्या वडिलांनी त्यांना हुंडा पण दिला होता. यात 1 एकर जमीन,  10 लाखाची गाडी आणि सोन्याचे दागिने दिले होते. मात्र, यावर किरण कुमार समाधानी नव्हता आणि त्याला वाटायचे की त्याची किंमत यापेक्षा जास्त आहे. असे विस्मयाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

विस्मयच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तिचा नवरा तिला कमी हुंड्यासाठी त्रास देत असे. दररोजच्या छळांनी ती कंटाळली होती आणि आयुष्य संपण्यापूर्वी तिने आपल्या नवर्‍याला व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक मेसेजपाठवले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे केरळ पोलिसांचे म्हणणे आहे.

विश्मायाच्या वडिलांनी सांगितले की, एकदा एस किरण कुमारने त्यांच्या डोळ्यासमोर विस्मयाला मारहाण केली होती, परंतु समजविल्यानंतर तो शांत झाला होता. आपली मुलगी इतके मोठे पाऊल उचलेल हे माहित असते तर मी तिला कधीही त्या घरी पाठवले नसते.

राज्य महिला आयोगाने घेतली दखल

- Advertisement -

विस्मयाच्या वडिलांनी सांगितले की, जावयाला अजून 10 लाख रुपये हुंडा पाहिजे होता, परंतु मी एवढी रक्कम देण्यास सक्षम नव्हतो. या गोष्टीने नाराज होऊन किरण कुमार माझ्या मुलीसोबत मारहाण करायचा. या गोष्टीने ट्रस्ट होऊन माझ्या मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्ट नुसार, राज्य महिला आयोगाने त्याच्या विरोधात केस केली असून, पोलिसांकडुन प्रकरणाची माहिती मागवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.