प्रियकराच्या मदतीने 6 वर्षाच्या मुलीसमोरच केला पतीचा खून, घरातच पुरला मृतदेह

0

- Advertisement -

मुंबई: मुंबईच्या दहिसर भागात राहणार्‍या एका महिलेने तिच्या प्रियकरच्या मददतीने पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव राशिदा शेख असून तिला अटक करण्यात आली आहे. पटियाच्या हत्येत मदत करणारा आरोपी प्रियकर अमित मिश्रा अजूनही फरार असल्याचे सांगितले.

आरोपींनी त्याच्या लहान मुलीसमोरच धारदार शस्त्राने पीडित रईस शेखचा गळा चिरून त्याची हत्या केळ्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी रईस शेखचा मृतदेह घरातील किचन मध्ये पुरले. पीडित रईस शेख एका कापड दुकानात काम करत असे. त्याच्या शेजारी राहणार्‍या एका व्यक्तीने एक आठवड्यापेक्षा जास्त काळापासून रईस शेख न दिसल्याने 25 मे रोजी पोलिसांत एक व्यक्ती हरवण्याची तक्रार केली होती.

- Advertisement -

घटनेच्या काही दिवसांनंतर मृतक रईस शेखचा भाऊ त्यांना भेटण्यास घरी आला होता. तेव्हा मृतकाच्या मुलीने झालेली घटना रडत रददात त्याला सांगितल्यामुळे हे अमानवीय कृत्य समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृतकाच्या भावाने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिस आता पुढील प्रक्रिया पूर्ण करत असून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.