कोविड संबंधित वैद्यकीय उपकरणांच्या आयातीवरील कर सवलतीत 31 ऑगस्ट पर्यंतवाढ, लसीवरील जीएसटीबद्दल निर्णय नाही

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोविड उपचारासंबंधित उपकरणावरील देण्यात आलेली आयात कर सवलत ३१ ऑगस्टपर्यंत २०२१ पर्यंत वाढविण्यात आली असून म्युकरमायकोसिसचे वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन यावर उपचार करिता वापरण्यात येणारे अॅम्फोटेरेसिनी बी (Amphotericin B) इंजेक्शनवरील कर माफ करण्यात आला असल्याची माहीती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

नियमांनुसार फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेली 43 वी जीएसटी काऊन्सिलची बैठक बैठक सात महिन्यानंतर आज सितारामन यांच्या अध्यतेखाली पार पडली. या बैठकीत राज्य, केंद्रशासित प्रदेशातील अर्थमंत्री आणि केंद्र आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहीती दिली आहे.

कोविड संदर्भातील साहित्यांच्या आयातीवरील IGST सवलतीतही ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पंजाब, दिल्ली राजस्थान, बंगाल, केरळसह अनेक राज्यांनी कोविड लसीवरील जीएसटी कर 5 टक्के कर हटविण्यात अशी जोरदार मागणी मांडली आहे. परंतु केंद्र सरकार मात्र त्यावर अडून बसले आहे.

तसेच वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिजन कान्सेंट्रेटर, पल्स ऑक्सिमीटर आणि कोविड टेस्टींग किट यावर आकारण्यात येणा-या 12 टक्के जीएसटी कराला कमी करून तो 5 टक्के करावा. अशा विविध मागण्या राज्य सरकारांनी केल्या आहेत. त्यावर बैठकीत चर्चा झाली त्यावर मंत्री परिषदेच्या गटाकडे त्याबद्दल प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याचा अहवाल 8 जून रोजी आल्यानंतर त्यावर विचार होणार आहे.

तसेच केंद्र सरकार जीएसटी भरपाई म्हणून राज्य सरकारांना 1.58 लाख कोटी रुपयांचे कर्ज स्वरुपात देण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.