कोरोनाच्या उपचारासाठी खर्च रक्कमेवर लागणार नाही टॅक्स, केंद्र सरकारचा निर्णय

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोरोनाच्या साथीमुळे केंद्र सरकारने करदात्यांना थोडा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी आपल्या कमाईतील रक्कम कोरोनाच्या उपचारावर खर्च केली आहे, त्या रक्कमेवर लागणार्‍या करात सूट देण्यात येईल असे मोदी सरकारच्या निर्णयांविषयी माहिती देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. कोरोनाच्या उपचारात ज्यांनी 10 लाखांपर्यंत खर्च केला आहे त्यांना करात सूट देण्यात येईल.

अनुराग ठाकुर पुढे म्हणाले की, “जर एखादा मालक आपल्या कर्मचार्‍याच्या कोविड ट्रीटमेंटवर खर्च करत असेल तर त्या कर्मचार्‍याला आणि मालकाला कोणताही कर भरावा लागणार नाही. एखाद्याच्या मृत्यूनंतर, मालक आपल्या कर्मचार्‍यांना अतिरिक्त रक्कम देत असेल तर सूट मिळेल.”

जर एखादा बाहेरचा व्यक्ति दुसर्‍या व्यक्तीची मदत करत असेल किंवा दुसर्‍या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची मदत करत असेल तर त्या व्यक्तिला आणि कुटुंबालाही टॅक्स भरण्यापासून सूट देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी 10 लाख रुपयाची मर्यादा ठेवण्यात आली असल्याचे, अनुराग ठाकुर यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट केले की, “कोविड पीडित लोकांच्या आर्थिक परिस्थितीची सरकारने पूर्ण काळजी घेतली आहे. पीडित आणि नियोक्ता दोघांनाही उपचारात खर्च झालेल्या रकमेवर आयकरात सूट दिल्यामुळे  त्यांना निश्चित दिलासा मिळेल. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कल्याणकारी धोरण दर्शविते.”

- Advertisement -

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.