PF खात्यातील शिल्लक आता तपासा SMS द्वारे

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशभरातील कामगार, नौकरदार वर्ग आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करण्यावर भर देत असतो. त्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते (Provident Fund) ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानतात. त्यात दरमहा मिळणा-या आपल्या पगारातील एक ठराविक रक्कम गुंतवणूक करण्याची सुविधा असते. त्यावर केंद्र सरकार अशा गुंतवणूकीवर व्याजही देते. परंतु अनेक कर्मचारी आपल्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे कधी तपासून पाहतात का ? हा एक मोठा प्रश्न आहे.

आता आपल्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात वेळेवर पैसे जमा होतात की नाही, हे आता घर बसल्या काही मिनिटात एका SMS द्वारे तपासता येऊ शकते.

जर तुमचा UAN नंबर EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे रजिस्टर असेल तर तुम्हाला तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक SMS द्वारे मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG/MAR (शेवटचे तीन अक्षरे तुम्हाला ज्या भाषेत संदेश हवा आहे, त्या भाषेसाठी आहेत) असा SMS लिहून पाठवावा लागेल. त्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील माहीती SMS मिळेल.

इंग्रजी, पंजाबी, हिंदी, मराठी, क्न्नड, तेलगू तमिळ, मल्याळी आणि बंगाली ह्या विविध भाषांमध्ये अशी SMS सेवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisement -

परंतु या सेवेसाठी तुमचा UAN, Bank Account numbar, PAN आणि Adhaar कार्ड नंबर हे सर्व भविष्य निर्वाह निधी खात्याशी संलग्नित असणे आवश्यक आहे.

तसेच EPFO संस्थेच्या संकेतस्थळावरही तुम्ही आपल्या खात्यातील शिल्लक तपासू शकता.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.