वाढदिवस विशेष: आपल्या सौंदर्याने दाऊदलाही भुरळ घातलेल्या मंदाकिनीचे खरे नाव माहिती आहे का? ऐकून आश्चर्य वाटेल

0

- Advertisement -

1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटात बोल्ड सीन देऊन अभिनेत्री मंदाकिनी रातोरात प्रसिद्ध झाली होती. 1985 मध्ये सुरू केलेल्या आपल्या 6 वर्षाच्या छोट्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट केले. मात्र त्या नंतर त्या कुठे गायब झाल्या हे कोणालाचा समजले नाही. मंदाकिनीच जन्म 30 जुलै 1963 मध्ये झाला. काही दिवसांपूर्वी चित्रपटसृष्टीत परतण्याची इच्छा व्यक्त करत मंदाकिनी चर्चेत होती.

आई-वडील वेगवेगळ्या धर्माचे

आपले पाहिल्याच चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या मनावर भुरळ घालणार्‍या मंदाकिनीचे खरे नाव बर्‍याच लोकांना माहीत नाही. मंदाकिनीचे खरे नाव यास्मीन जोसेफ होते. तिची आई मुस्लिम होती आणि वडील ख्रिश्चन होते.

‘मजलूम’ द्वारे करणार होती पदार्पण पण…

मंदाकिनीला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. परंतु तिला योग्य संधी मिळत नव्हती. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटापूर्वी तिला तीन चित्रपट निर्मात्यांनी तीला नकार दिला होता. त्यानंतर रंजीत विर्क यांनी तिचे नाव बदलून माधुरी ठेवले होते आणि तिला ‘मजलूम’ या चित्रपटासाठी निवडले होते.

- Advertisement -

मंदाकिनीचे माधुरी या नावाने ‘मजलूम’ या चित्रपटाद्वारे पदार्पण निश्चित झाले होते. मात्र, या चित्रपटाचे काम सुरू होण्यापूर्वीच राज कपूर यांची नजर मंदाकिनीवर पडली. त्यावेळी ती 22 वर्षाची होती. राज कपूरने मंदाकिनीला ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटासाठी साइन केले. हा चित्रपट नंतर ब्लॉकबस्टर झाला. चित्रपटातील तिच्या नदीवरील सीनमुळे मंदाकिनीची चर्चा सर्वत्र पसरली.

चित्रपटात मंदाकिनीने बरेच बोल्ड सीन्स दिले, जी त्या काळानुसार खूप ग्लॅमरस होती. राम तेरी गंगा मैली वगळता मंदाकिनी इतर अनेक कारणामुळे नेहमी चर्चेत राहायची. दाऊद इब्राहीम सोबतच्या तिच्या कथित प्रेम प्रकरणामुळे ती विवादात होती. नंतरच्या काळात चांगले चित्रपट न मिळाल्याने तिने चित्रपटसृष्टीला रामराम केला.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.