‘या’ देशांनी घातली अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटावर बंदी, वाचा सविस्तर माहिती

0

- Advertisement -

मुंबई: अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकांना हा चित्रपट आवडत आहे. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये अक्षय कुमारचा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षक चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. परंतु काही अरब देशांनी त्यांच्या देशात हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटामुळे त्यांच्या देशाची प्रतिमा मलीन झाल्याचा त्यांनी आरोप केला असून, सौदी अरेबिया, कुवेत आणि कतार या देशांमध्ये बेलबॉटम चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या देशांच्या सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एका दृश्याबद्दल आक्षेप घेतला आहे.

चित्रपटात 80 चे युग दाखवण्यात आले असून, भारतातील पहिले गुप्त ऑपरेशन चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या उत्तरार्धात अपहरणकर्ते लाहोरहून दुबईला विमान कसे नेतात हे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट 1984 मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या सैन्याने अपहरणकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर संरक्षण मंत्री मोहम्मद बिन रशीद यांनी परिस्थिती हाताळली.

रणजीत एम तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बेलबॉटम’ मध्ये अक्षय कुमार सोबत लारा दत्ता, वाणी कपूर, आदिल हुसेन आणि हुमा कुरेशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपट सत्य घटनेवर आधारित 

चित्रपटात भारतीय अधिकारी एक गुप्त मिशन कसे पार पाडतात हे दाखवण्यात आले असून. त्या मिशनची माहिती अरब देशांतील संरक्षणमंत्र्यांनाही नसते. कथेतील या सीनमुळे तेथील सेन्सॉर बोर्डाने नाराजी व्यक्त केली आणि चित्रपटाच्या  रिलीजवर बंदी घातली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

19 तारखेला झाला बेलबॉटम प्रदर्शित

‘बेल बॉटम’ हा चित्रपट 19  ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. भारतात अजूनही सिनेमागृह पूर्णपणे उघडलेले नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये 50 टक्के क्षमतेसह सिनेमा सुरू आहेत. साहजिकच, आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या व्यवसायात तेजी येईल.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.