अमेझॉनने तब्बल 614 अब्ज रुपयांत विकत घेतली हॅालीवूडची जगप्रसिध्द चित्रपट कंपनी

0

- Advertisement -

अमेझॉन कंपनीने जवळपास 100 वर्षे जुनी जगप्रसिद्ध चित्रपट निर्माती कंपनी मेट्रो-गोल्डविन-मेयर (MGM) विकत घेतली आहे. तब्बल 8.45 अब्ज डॉलर्समध्ये (भारतीय मूल्य सुमारे 614 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) हा व्यवहार झाला आहे.

अमेझॉन ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील आपला दबदबा कायम ठेवत Prime Video द्वारे ऑनलाइन विडियो स्ट्रीमिंग क्षेत्रात आपले भक्कम स्थान निर्माण केले. मात्र, Disney+ आणि HBO Max या प्रतिस्पर्धी विडियो  स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने अमेझॉनला या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण केलेली आहे. यामुळे Prime Video वर कंटेंट वाढवण्यासाठी अमेझॉनने MGM कंपनीच विकत घेतली असल्याचे समजते.

एमजीएम कडे Prime विडियोवर स्ट्रीम करण्यासाठी प्रचंड मोठा साठा आहे. एमजीएमने  बनवलेले सर्व चित्रपट आणि इतर विडियो कंटेंट आता Prime Videoवर दिसणार आहेत.

MGM चा थोडक्यात इतिहास

एमजीएम चित्रपट निर्मात्या कंपनीने हॉलीवुड मध्ये आपले स्थान अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवले होते. एप्रिल 17, 1924 मध्ये मार्कस लोएव आणि लुईस मेयर यांनी मिळून एमजीएमची स्थापना केली होती. तीन कंपन्यांच्या एकत्रीकरणाने ही कंपनी बनली होती.

- Advertisement -

पुढे MGM जगातील सर्वात मोठी  चित्रपट निर्माती कंपनी बनली.

या कंपनीने बनवलेले काही जगप्रसिद्ध चित्रपट

1924 पासून या कंपनीने शेकडो चांगले आणि दर्जेदार चित्रपट बनवलेले आहेत. त्यांपैकी अत्यधिक नावाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत

  • बेन-हुर
  • गॉन विथ द विंड
  • जेम्स बॉन्ड मालिका
  • द हॉबीट मालिका
  • पिंक पॅंथर
  • रॉकी
  • डाय अनादर डे

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.