सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत ऑस्कर जिंकून क्लोई झाओ यांनी रचला इतिहास, ही कामगिरी करणार्‍या बनल्या पहिल्या आशियाई महिला…

93 वे ऑस्कर पुरस्कार जाहीर

0

- Advertisement -

Chloe Zhao

फिल्ममेकर क्लोई झाओ यांनी 93 व्या अकॅडेमी अवॉर्ड्समध्ये नोमॅडलँडचित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणार्‍या दुसर्‍या महिला बनल्या आहेत. 2009 मध्ये हर्ट लॉकर चित्रपटासाठी ऑस्कर जिंकणार्‍या कॅथरीन बिगेलो ह्या पहिल्या महिला होत्या.

A still from the film NOMADLAND

क्लोई झाओ ह्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत ऑस्कर पुरस्कार जिंकणार्‍या पहिल्या आशियाई महिला बनल्या आहेत.

- Advertisement -

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या गटात, एमराल्ड फेनेल (प्रॉमिसिंग यंग वूमनसाठी), यून यू-जंग (मिनारीसाठी), थॉमस विंटरबर्ग (अनॉदर राऊंड) आणि डेव्हिड फिन्चर (मानकसाठी) पुरस्काराच्या शर्यतीत होते. या सर्वांना मागे ताकत त्यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.

Nomadland Poster

नोमॅडलँडहा झाओचा तिसरा चित्रपट आहे. त्याच नावाच्या जेसिका बर्डर यांच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटात, फ्रान्सिस मॅकडॉर्मंड यांनी  फर्नची भूमिका साकारली आहे.

झाओ यांनी दिग्दर्शनाची सुरूवात 2015 मध्ये ‘ Songs My Brothers Taught Me’ या चित्रपटापासून केली होती. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या The Rider या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटापासून  त्यांना वैश्विक ओळख मिळाली. नोमॅडलँडमध्ये डेविड स्ट्रेथेर्न आणि लिंडा मे यांनी काम केलं आहे. या चित्रपटाने ऑस्कर सोबतच गोल्डन ग्लोब्स क्रिटीक चॉइस अवार्ड, बाफ्टा अवार्ड इत्यादि महत्वपूर्ण पुरस्कार जिंकले आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.