‘रिया चक्रवती सोबत चुकीचे घडले’, इमरान हाश्मीने दिली सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया

0

- Advertisement -

मुंबई: बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्युला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूप ट्रोल झाली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. रियाला आणि तिच्या कुटुंबालाही फार ट्रोल केले गेले. या काळात बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी रियाची साथ दिली. मात्र, विवेक ओबेरॉय आणि कंगना राणावत सारख्या सेलेब्सने रियाला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. माध्यमांनी या प्र्करणात रिया चक्रवर्तीच्या कुटुंबियांनाही सोडले नव्हते, त्यांच्या घरबाहेर गर्दी करून माध्यमांनी त्यांना नाहक त्रास दिला. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवतीचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.

रिया चक्रवर्तीसोबत घडलेली मीडिया ट्रायल अजिबात योग्य नव्हती – इमरान हाश्मी

आता रिया चक्रवर्तीचा चित्रपट ‘चेहरे’  रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी सारखे मोठे कलाकार देखील आहेत. दरम्यान, रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ इम्रानने प्रतिक्रिया दिली आहे. इम्रानने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ” मला वाटते की, रिया चक्रवर्तीसोबत घडलेली मीडिया ट्रायल अजिबात योग्य नव्हती.”

काही माध्यम संस्था पत्रकारितेच्या मूल्यांचे पालन करत नाहीत

- Advertisement -

इमरान हाश्मी पुढे म्हणाले, “माध्यमांनी एका कुटुंबाचे आयुष्य जवळजवळ उद्ध्वस्त केले. कशासाठी? मीडियातील काही लोक फक्त सांगत होते, आणि अंदाज लावत होते. काही लोक प्रत्यक्षात खरी आणि चांगली रिपोर्टिंग करतात, परंतु बरेच लोक त्याच्या पत्रकारितेच्या मूल्यांचे, नैतिकतेचे पालन करत नाहीत. जेव्हा प्रत्येकजण मुक्यांचे अनुसरण करेल तेव्हाच सर्वकाही चांगले होईल. प्रत्येकाला हे समजले पाहिजे की आपल्या देशात न्याय व्यवस्था आहे. तरीही काही लोक किंवा माध्यम संस्थांनी कोणताही पुरावा नसताना रियाला गुन्हेगार घोषित केले होते.”

27 ऑगस्ट रोजी ‘चेहरे’ हा चित्रपट सिनेमगृहात होणार प्रदर्शित

रिया चक्रवर्तीचा ‘चेहरे’ हा चित्रपट  सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट 27 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणारअसून, या चित्रपटात रिया चकरवती असाल्यामुळे चित्रपट आधीच वाद होता. निर्मात्यांनी रिया चक्रवर्तीला चित्रपटाच्या पोस्टरमधून काढून टाकले. तसेच, चित्रपटाच्या ट्रेलरमध्येसुद्धा रियाला व्यवस्थित दाखवण्यात आले नाही. ट्रेलरमध्ये रियाची फक्त झलक दाखवण्यात आली आहे.  कोरोनामुळे काही राज्यात सिनेमगृहा टक्के उपस्थितीने सुरू आहेत. हा चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित न करता थेट सिनेमगृहात प्रदर्शित होत असल्याने निर्मात्यांचे कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.