आता तरी देवा मला पावशील का…! गीताचे गीतकार लोककवी हरेंद्र जाधव यांचे निधन…..

दहा हजाराहून अधिक गीतांचे लेखन..

0

- Advertisement -

‘आता तरी देवा मला पावशील का’… ‘तुच सुखकर्ता. तुच दुःखहर्ता..अवघ्या दिनांच्या नाथा’….पहा पहा मंजूळा हा माझा भीमरायाचा मळा….तुझा खर्च लागला वाढू सांग कितीदा कर्ज काढू….अशा ऐकापेक्षा एक सरस भक्तीगीत आणि लोकगीत लिहीणारे आंबेडकरी चळवळीतील कलाकार व लोककवी हरेंद्र हिराणम जाधव यांचे आज वयाच्या 87 वर्षी निधन झाले आहे.

दहा हजाराहून अधिक गीते, 75 हूनही अधिक कथा, अनेक सामाजिक लोकनाट्ये, पोवाडे यांचे लिखाण करीत आयुष्यातील 60 वर्षाहूनही अधिक काळ त्यांनी काव्य कला निर्मती केली.

कथा भीमरायाची, कथा गुजरात भूकंपाची, कथा गौतम बुद्धांची, कथा संत कबीराची, शिवरायांची पराक्रम कथा अशा विविध कथा जनसामान्याचा मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून त्यांनी लिहिल्या. आपल्या गीतांची रचनाही लोककलेशी सुसंगत ठेवल्यामुळे ते महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील समाजबांधवान पर्यंत समजप्रबोधनात्मक विचार पोहोचविण्यात यशस्वी झाले. फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारांची मशाल त्यानी नेहमीच आपल्या लिखाणामधून धगधगत ठेवली.

प्रल्हाद शिंदे, अजित कडकडे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, बेला सुलाखे, साधना सरगम अशा अनेक गायक, गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत.

- Advertisement -

जीवन पट

16 फेब्रुवारी 1933  जन्मलेल्या हिरेद्र जाधव यांचे नाशिक जिल्ह्यातील मिग-ओझर हे मूळ गाव. लहानपणापासूनच लेखनाची आणि समाजकारणाची आवड असलेले जाधव, १९४७ साली सातवी पास झाल्यानंतर पुढे शिक्षण घेत असताना लेखनाची गोडी लागली. ही आवड ध्येयात पारावर्तीत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची घट्ट पकड आणि उराशी बाळगलेले समाजकारणाचे ध्येय ज्याला अर्थकारणाचा किंचितही लवलेश नव्हता. त्यांनी सुरु केलेल्या आंबेडकरी जलशा संपल्यावर सर्वाना एक नारळ आणि सव्वा रुपया देऊन गावातील लोक सत्कार करीत असत आणि तेच मानधन लाख मोलाच ठरत असे.

१९५८ साली मुंबईला आल्यानंतर शिक्षकी पेशा मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यात ३३ वर्ष शिक्षक म्हणून ते कार्यरथ होते, पुढे मुख्यध्यापक ह्या पदावरून १९९२ साली स्वेच्छा निवृत्त झाले. मुंबईत आल्यावरही त्यांचे गण्याचे वेड मात्र चालूच होते. हळू हळू त्यांच्या आंबेडकरी जलश्याचे रुपांतर कव्वाली मध्ये होत गेले. घाटकोपर येथे किसन खरात आणि पार्टी कवी लोककवी हरेंद्र जाधव अशी कव्वाली पार्टी त्यांनी निर्माण केली. त्यांचा पहिलाच सामना बोरीबंदर येथे प्रल्हाद शिंदे यांच्या सोबत झाला. अश्या कव्वाली सामन्यांमधे ते शीघ्रकवी म्हणूनही ओळखले जात असत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.