कंगणा विरोधात एफआयआर दाखल, दंगल भडकवण्याचा गंभीर आरोप

0

- Advertisement -

पश्चिम बंगाल: प्रत्येक विषयावर विवादीत प्रतिक्रिया देणार्‍या कंगणा राणावत विरोधात पश्चिम बंगालच्या उल्टाडंगा मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. टीएमसी नेते रिजू दत्ता यांनी ही एफआयआर दाखल केली आहे. त्यांनी कंगणावर राज्यात दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

या तक्रारीत रिजू दत्ता म्हणाले की, कंगणाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर इन्स्टाग्रामवर एक नव्हे तर अनेक आक्षेपार्ह पोस्ट पोस्ट केल्या आहेत. रिजू दत्ता यांनी त्या पोस्ट्सचे स्क्रीनशॉटदेखील पोलिस स्टेशनमध्ये जमा केले आहेत.

अलीकडेच बंगाल हिंसाचारावरील आक्षेपार्ह ट्विटमुळे कंगणाचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील कथित हिंसाचारावर अभिनेत्रीने भाष्य केले होते. एवढेच नव्हे तर आपल्या एका ट्विटमध्ये तिने ममता बॅनर्जी यांना ‘रक्तासाठी तहानलेली राक्षस’ म्हटले होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.