वरुण संदेशच्या ‘इंदुवदना’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

0

- Advertisement -

हैदराबाद: दक्षिणात्य अभिनेता वरुण संदेशचा नवीन चित्रपट ‘इंदुवदना’चा (Induvadana) फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाले आहे. रिलीज होताच पोस्टर चर्चेचा विषय बनला आहे. पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टर चर्चेचा विषय होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे या पोस्टरमध्ये वरुण संदेश आणि त्याची अभिनेत्री टॉपलेस असून दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. पोस्टर खूप रोमँटिक असून बर्‍याच लोकांना आकर्षित करत आहे.

अभिनेत्री फर्नाझ शेट्टी करणार पदार्पण 

- Advertisement -

चित्रपटात वरुण संदेशसोबत नवखी फर्नाझ शेट्टी दिसणार आहे. पोस्टरमध्ये दोघेही रेट्रो लूकमध्ये दिसत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन एमएसआर (MSR) यांनी केले आहे तर श्री बालाजी पिक्चर्सच्या बॅनरखाली माधवी अदूर्ती यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा सतीश आकाटी यांनी लिहिली असून शिवा काकानी चित्रपटाचे संगीत तयार करणार आहेत.

निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणताही खुलासा केलेला नाही, परंतु लवकरच ते याबाबत माहिती देणार असल्याचे कळते.

वरुण संदेश तेलुगु सिनेमातील लोकप्रिय अभिनेता आहे, परंतु तो बर्‍याच दिवसांपासून तेलगू सिनेमापासून दूर होता. 2007 मध्ये ‘हॅपी डेज’ या चित्रपटाद्वारे त्याने पदार्पण केले होते. शेवटी 2015 मध्ये ‘मामा मंचू अल्लुडू कंचू’ चित्रपटात तो दिसला होता. या व्यतिरिक्त तो 2019 मध्ये बिग बॉस तेलगूच्या तिसर्‍या सीझनमध्येही दिसला होता. या रियालिटीशो मध्ये तो चौथ्या क्रमांकावर होता. इंदुवदना व्यतिरिक्त वरुण ‘व्हेनेलो लो वर्षाम‘ आणि ‘ट्विस्ट‘ चित्रपटात दिसणार आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.