नेटफ्लिक्सच्या ’दि फिशरमेन्स डायरी’ इफ्फा महोत्सवात अव्वल

आगामी जानेवारी 2022 मध्ये दाखविले जाणार विजयी चित्रपट

0

- Advertisement -

अहमदनगर: येथे दरवर्षी आयोजित होत असलेल्या अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फा) तिसर्‍या महोत्वसाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॅार्मवरील ‘द फिशरमेन्स डायरी’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सहा पुरस्कार जिंकले आहेत. ऑस्करसाठीही कॅमेरून या देशाकडून प्रवेशित झालेल्या या चित्रपटात एका मुलीची गोष्ट असून जी तिच्या वडिलांकडे आणि खेड्यातील शिक्षणाकडे दुर्लक्ष करते.

सर्वोत्कृष्ट चित्रपटा व्यतिरिक्त द फिशरमेन्स डायरीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार आणि सर्वोत्कृष्ट संकलन पुरस्कार मिळाला.

लघुचित्रपट विभागात (शॉर्ट फिल्म) जर्मनीच्या अल्स डाई वेले ब्रॅचने (अ‍ॅस द वेव्ह ब्रोक) प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. बांबू बॅलड्सने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार पटकाविला आहे. दोन जगातला कवी भारतीय लघु चित्रपटाच्या स्पर्धेचा विजेता म्हणून तर विपरालब्धा ला विद्यार्थी गटात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान देण्यात आला.

यावर्षी महोत्सवाकरिता सुमारे 49 देशांतून, 285 एन्ट्रीज आल्या होत्या. यामध्ये फिचर फिल्म, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज आणि ऍनिमेशन फिल्म्सचा समावेश होता. अत्यंत दर्जेदार आणि उत्तम कलाकृती दरवर्षी या महोत्सवात पाहायला मिळतात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे या फेस्टिव्हलचा आनंद रसिकांना घेता आला नाही. फक्त परीक्षकांसाठी फिल्म्सचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवाची तिसरी आवृत्ती मार्चमध्ये होणार होती. जानेवारी 2022 मध्ये होणा-या पुढील इफ्फा आयोजनात विजयी चित्रपट दाखवले जातील असे फेस्टिव्हल डारेक्टर शैलेश थोरात यांनी सांगितले.

‘सिनेमासाठी प्रेम कधीच बदलणार नाही’ असा या वर्षी या महोत्सवाचा विषय

ज्युरीच्या सदस्यांपैकी एक चित्रपट समीक्षक संतोष पठारे म्हणाले की, “इफ्फामध्ये अनेक उल्लेखनीय नोंदी असल्याने एकाही सर्वोत्कृष्ट चित्रपट किंवा शॉर्ट फिल्मची निवड करणे खूप कठीण होते.”

“यावर्षी जरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव्हलचे आयोजन करता आले नाही, परंतु पुढच्या वर्षी फिल्म फेस्टिव्हल हा आणखी दिमाखात आणि मोठ्या स्वरूपात आयोजित केला जाईल, तसेच चित्रपटांच्या बाबतीत वेगवेगळ्या कलाकृती घडत राहणं हे फार महत्त्वाचे आहे’ असे इफ्फा महोत्सवाला नेहमीच पाठबळ देणारे मा.श्री.गौतम मुनोत म्हणाले.

गौतम मुनोत यांची सतत मिळणारी साथ व प्रेरणा आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून मिळणारी मदत याबद्दल इफ्फा आणखी उत्तम पद्धतीने आयोजित करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करीत महोत्सवाचे संचालक विराज मुनोत आणि प्रशांत जठार यांनी त्यांचे आभार मानले.

 

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल च्या 2020- 2021 मध्ये मिळालेली पारितोषिके पुढीलप्रमाणे –

इफ्फा सर्वोत्कृष्ट चित्रपट : द फिशरमेन्स डायरी

देश : कॅमरून

 

इफ्फा सर्वोत्कृष्ट लघुपट:

ॲज द वेव ब्रोक : जर्मनी

 

इफ्फा सर्वोत्कृष्ट लघुपट (भारत) :

दोन जगातला कवी

देश : भारत

 

इफ्फा सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंटरी : बांबू बॅलड

देश:  भारत

 

- Advertisement -

इफ्फा सर्वोत्कृष्ट लघुपट (ॲनिमेशन) :

रेनाईडान्स

देश: अमेरिका

 

इफ्फा सर्वोत्कृष्ट अभिनेता : कांग क्विंटस :

फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

 

इफ्फा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :नडामो डमाराइस

फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

 

इफ्फा सर्वोत्त्कृष्ट बालकलाकार: फेथ फिडेल

फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

 

इफ्फा सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक: इनाह जॉनस्कॉट

फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

 

इफ्फा सर्वोत्कृष्ट कॅमेरामन: ख्रिस हिर्शहॉयझर

फिल्म : टोप्राक

 

इफ्फा सर्वोत्त्कृष्ट संकलन : डिबा जे. ब्लेर्क

फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

 

इफ्फा सर्वोत्त्कृष्ट संगीत : शाउल बुस्टान

फिल्म : टोप्राक

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.