‘या’ शहरात सुरू झाले देशातील सर्वात उंच स्थानावरचे चित्रपटगृह

0

- Advertisement -

लेह: देशातील अति दुर्गम भागात अर्थात लडाखमध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव आणण्याच्या प्रयत्नात, लडाखमध्ये एक खासगी कंपनीने इन्फ्लॅटेबल थिएटर सुरु केले आहे. पिक्चरटाइम डिजीप्लेक्सने लेहमध्ये इन्फ्लेटेबल थिएटर बसवले आहे. डिजीप्लेक्सच्या मते, मोबाईल थिएटर 11,562 फूट उंचीवर आहे.

लेहच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या मैदानावर इन्फ्लॅटेबल थिएटरचे नुकतेच बॉलीवूड मधील अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

“हे परवडणारी तिकिटे देते आणि त्यात अनेक सुविधा आहेत. बसण्याची व्यवस्था देखील चांगली आहे,” मेफम ओत्सल, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे मेफम ओत्सल यांनी म्हटले आहे.

स्टेन्झिन टँकॉन्ग दिग्दर्शित लडाखच्या चांगपा या भटक्या जमातीवर तयार केलेला ‘सेकूल’ हा लघुपट थिएटरच्या उद्घटानाप्रसंगी दाखवण्यात आला. याशिवाय अक्षय कुमारचा बेलबॉटम हा चित्रपटही या लेहच्या थिएटरमध्ये दाखवण्यात आला होता.

मोबाईल सिनेमा हॉल म्हणजेच एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी हलविता येणा-या चित्रपट गृहात मोठ्या स्क्रीनवर डिजिटल, डीसीआय (डिजिटल सिनेमा इनिशिएटिव्ह) या तंत्रज्ञानासह डॉल्बी 5.1 सराउंड साउंड देखील उपलब्ध आहे. हे सर्व एका हवेद्वारे फुगवलेल्या बंदिस्त कुपीत असून ज्यामध्ये 150 लोक बसण्याची क्षमता आहे. तथापि, सध्या COVID-19 प्रोटोकॉलमुळे प्रेक्षकांची संख्या 75 पर्यंत मर्यादित असेल.

- Advertisement -

“नागरिकांच्या मनोरंजनासाठी देशाच्या अति दुर्गम ठिकाणांपर्यंत पोहोचण्याचा आमचा नेहमीच उद्देश असून लडाख बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर सिनेमा दिसत नव्हता आणि मला इथल्या लोकांसाठी मल्टिप्लेक्स सिनेमा पाहण्याचा अनुभव आणायचा होता असे पिक्चरटाइम डिजीप्लेक्स. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील चौधरी यांनी म्हटले आहे.

बॉलीवूड मधील नामांकित असे लक्ष्य, दिल से, ट्यूबलाइट आणि सर्वाधिक लोकप्रिय 3 इडियट्स सारख्या चित्रपटांचे चित्रिकरण लडाख ऐतिहासिकदृष्ट्या लोकप्रिय स्थानांवर करण्यात आले आहे. परंतु स्थानिकांना त्यांच्या भौगोलिक प्रदेशांचे सौंदर्य मात्र रुपेरी पडद्यावर पाहण्याची जादू अनुभवण्यासाठी खूप वेळ लागला आहे.

येत्या महिन्यात लडाखमध्ये दोन कायमस्वरुपी सिनेमा गृहे आणि एक मोबाईल सिनेमा गृह सुरु करण्याचे आमचे ध्येय आहे आणि लडाखच्या नागरिकांनाही नव्याने प्रदर्शित होणाऱे चित्रपट पहायला मिळतील, असेही ते म्हणाले.

 ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.