माझ्या देशातील लोक मरताहेत मदत करा – प्रियंका चोप्राचे जगभरातील चाहत्यांना आवाहन

0

- Advertisement -

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासह, बधितांना रूग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे हाल सोसावे लागत आहेत. या परिस्थितीत बहुतांश कलाकार मदतीसाठी पुढे येत आहेत. या यादीत प्रियंका चोपरा सुद्धा आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने सर्व लोकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. प्रियंका सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती आहे.

प्रियंकाने सोशल मिडियावर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्याद्वारे तिने हा संदेश दिला आहे. प्रियंकाने लिहिले की, ‘भारत माझे घर आहे. भारतात अत्यंत वाईट परिस्थिति असून प्रत्येकास मदतीची आवश्यकता आहे. सर्वत्र रोग पसरत आहे आणि तो मोठ्या संख्येत लोक मरत आहेत.’

- Advertisement -

ती स्वतःही आर्थिक मदत करत असल्याचे प्रियंकाने संगितले. तिने पुढे लिहिलं की ‘निक आणि मी आधीच मदत करत आहोत आणि आम्ही आमच्या परीने सतत योगदान देत आहोत. हा विषाणू किती दूर पसरला हे आपण सर्वांनी पाहिले आहे. जोपर्यंत सर्वजण सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही.’ सोबतच तिने मदत करणार्‍या व्यक्तींचे आभार मानले असून, आपण लवकरच ही लढाई जिंकण्याचा आशावाद ही केला.

त्याचबरोबर व्हिडिओमध्ये प्रियंका म्हणते, ‘यावेळी इतकी गरज का आहे? मी तुम्हाला सांगते, इस्पितळात जागा नाही. रुग्णवाहिका व्यस्त आहेत. ऑक्सिजनची तीव्र कमतरता आहे. स्मशानभूमीत मोठी गर्दी आहे. भारत हे माझे घर आहे आणि लोक तिथे मरत आहेत. जागतिक समुदाय म्हणून आपण पुढे आले पाहिजे. आपण एकमेकांची काळजी का घ्यावी हे मी स्पष्ट करते. प्रत्येकजण सुरक्षित होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. तर या साथीच्या आजाराच्या वेळी पुढे या आणि मदत करा. ‘

प्रियंकाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.