प्रियंका-निकने एकाच दिवसात उभारला 2 कोटी 87 लाखांचा मदतनिधी

0

- Advertisement -

मुंबई: कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशाला विळख्यात घेतले आहे. देशातील नागरिकांना या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकार सोबतच देशातील सर्व सेलिब्रिटी आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत..

प्रियंकाने केले होते मदतीचे आवाहन

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास या वाईट परिस्थितीत देशाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. प्रियंका चोप्राने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तिने आपल्या चाहत्यांना भारतासाठी उभारलेल्या मदतनिधीत दान करण्याची विनंती केली होती.

चाहत्यांनी दिला प्रतिसाद
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी अलीकडेच कोविड-19 मधून भारताला सावरण्यासाठी मदतनिधी उभारण्याच्या कामाची माहिती दिली. प्रियंका चोप्रा यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर जगभरातील चाहत्यांनी मदत देण्यास सुरवात केली आहे. खास गोष्ट म्हणजे केवळ 24 तासात प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी विविध दात्यांमार्फत 2 कोटी 87 लाख रुपयांची देणगी जमा केली आहे. याची माहिती स्वत: प्रियंका चोप्राने दिली आहे.

- Advertisement -

देणगीदारांचे मानले आभार
या व्हिडीओच्या माध्यमातून तिने भारताला मदत करण्यासाठी हात पुढे करणा-यांचे आभार मानले आहेत. व्हिडिओ शेअर करताना प्रियंका चोप्राने कॅप्शनमध्ये ‘टुगेदर फॉर इंडिया’ लिहिले आहे.
“आपल्या सर्व मदतीसाठी आणि देणगीबद्दल धन्यवाद. आपले सहकार्य भारतात वाढत्या कोरोना विषाणूविरूद्ध एक मोठा बदल घडवून आणणार आहे. अजून बरेच काही करायचे आहे. मला खात्री आहे की आम्ही ज्या वेगात सुरूवात केली आहे आम्ही सुरू ठेवू.” – प्रियंका चोप्रा

पूर्ण विडिओ इथे पहा:

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.