पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालला अटक

0

- Advertisement -

पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालला अटक

पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी ग्रेवाल आणि त्याच्या चित्रिकरण कऱणा-या काही जणांना पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील बनूर येथे चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली करण्यात आली. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

बानूर पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 188 (प्रशासकीय अधिकार्‍याचे आदेश न पाळणे), महामारी रोग अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अभिनेता जिम्मी शेरगीलवरही झाला होता गुन्हा दाखल 

काही दिवसांपूर्वी अभिनेता जिमी शेरगिल, दिग्दर्शक ईश्वर निवास आणि यू-ऑनर वेब सीरिज चित्रिकरणातील टिम मधील  35 जणांविरूद्ध पंजाबच्या लुधियाना येथे कोविड -19च्या  निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वेब सीरिजची टीम शहरातील आर्य वरिष्ठ माध्यमिक शाळेत कर्फ्यूच्या वेळी चित्रिकरण करत होती.

अभिनेता जिमी शेरगिल, दिग्दर्शक ईश्वर निवास तसेच सहायक सदस्य आकाशदीप सिंग आणि मनदीप सिंग यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोबतच अन्य तीस अज्ञात व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे डिव्हिजन नंबर 1 पोलिस ठाण्यातील सब इन्स्पेक्टर मनिंदर कौर यांनी सांगितले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.