सुमित्रा भावे यांचे निधन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका

0

- Advertisement -

पुणे : अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी निधन झाले. त्या 78 व्या वर्षांच्या होत्या.

अनेक सामाजिक विषयांना हाताळत त्यांनी  सुनील सुकथनकर यांच्या साथीने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘कासव’, ‘अस्तु’, ‘दहावी फ’, , ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’ अशा अनेक चित्रपटांना त्यांच्या दिग्दर्शनाचा परिसस्पर्श लाभला. राधिका आपटेसारख्या प्रतिभावंत अभिनेत्रीला त्यांनी ‘घो मला असला हवा’ या सिनेमातून संधी दिली होती.

भावेंचा जन्म 12 जानेवारी 1943 रोजी पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथे मराठी भाषेच्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून त्यांनी पॉलिटिकल सायन्स अँड सोशोलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवीही मिळवली. त्यासोबतच भावेंनी विविध स्वंयसेवी संस्थांसाठी काम केले.

बाई, पाणी लघुपटांना लोकप्रियता आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी 1995 मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. या चित्रपटालाही प्रेक्षक-समीक्षकांकडून पसंतीची मोहोर मिळाली. त्यांचे अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांतही गाजले.

- Advertisement -

भावे यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार

बाई – 1985 – सर्वोत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट
पाणी – 1987 – सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट
वास्तुपुरुष – 2002 – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
देवराई – 2004 – सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट
अस्तु – 2013 – सर्वोत्कृष्ट पटकथा
कासव – 2016 – सर्वोत्कृष्ट चित्रपट

राज्य शासन पुरस्कार विजेते चित्रपट

दोघी
दहावी फ
वास्तुपुरुष
नितळ
एक कप च्या

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.