आश्चर्यम्; वुहान मध्ये संगीत महोत्सव, हजारो लोक झाले सामील

कोरोना विषाणूचा येथून झाला होता प्रसार.

0

- Advertisement -

वुहान: कोरोना विषाणूचे उगमस्थान म्हणून जगात चर्चेला आलेल्या वुहान प्रांतात कोरोनाच्या विषाणू संसर्गकाळानंतर प्रथमच स्ट्रॉबेरी संगीत महोत्सवाचे आयोजन गेल्या आठवड्यात (1 मे) करण्यात आले होते.  आश्चर्याची बाब म्हणजे संगीत महोत्सवात कोरोनाच्या निर्बंधाच्या काळानंतर पहिल्यांदाच हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली असे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॅायटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरु होणारा हा महोत्सव गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन घेण्यात आला होता. मात्र चीन मधील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून त्या पार्श्वभुमीवर ह्या महोत्सवाला प्रशासनाने परवानगी दिल्याने आयोजन कऱण्यात आले असे आयोजकांच्या प्रतिनिधीने रॉयटर्सला सांगितले आहे.

यंदा प्रशासनाने परवानगी दिली असली तरी सहभागी प्रेक्षक श्रोत्यांची संख्या मर्यादित केली गेली. तरीही येथे सुमारे 11,000 लोकांनी आपली उपस्थिती या महोत्सवात लावली आहे. प्रशासनातर्फे प्रत्येक टप्प्यात अडथळे आणले गेले आणि त्या भागातील सुरक्षा कर्मचा-यांनी संख्या मर्यादित केली. काही प्रेक्षकांनी मास्क परिधान केले, परंतु बर्‍याच जणांनी विना मास्कच सहभागी होणे पसंत केले असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

वुहानमध्ये जगातील पहिला कोरोना विषाणूचा संसर्ग आढळला होता. त्यानंतर अनेक महिन्यांचे लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध घातले गेले. परंतु आता मात्र हे शहर जवळजवळ पूर्णपणे विषाणू-मुक्त झाले आहे, अधिकृत आकडेवारीनुसार. त्या शहारातील आणि देशातील अलिकडच्या काही महिन्यांतील प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे चीनमध्ये विषाणूबद्दलची भीती कमी झाली आहे.

“गेल्या वर्षी आम्हाला वुहानमध्ये कोरोना विषाणूचा त्रास झाला होता, परंतु आता आम्ही आता विषाणू प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झालो असून आता सामान्य जीवन अनुभवत आहोत,” असे 23 वर्षीय विद्यार्थी आणि वुहान निवासी गाओ युचेन याने म्हटले आहे.

- Advertisement -

वुहान गार्डन एक्सपो पार्कमध्ये तीन टप्प्यांत होत असलेल्या या महोत्सवात चीनमधील अनेक नावाजलेले आणि घरगुती गायक तसेच बँड एकत्र आले आहेत. राष्ट्रीय सुट्यांच्या काळात चीन मधील विविध शहरांमध्ये “स्ट्रॉबेरी संगीत महोत्सवाचे”कार्यक्रम आयोजित केले जातात.

चीनमध्ये गेल्या शुक्रवारी कोविड – 19 संसर्ग झाल्याचे 16 रुग्ण आढळले होते. त्या आधी गुरुवारी 13 रुग्ण आढळले होते अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने दिली आहे.

कोवीड संबधित आढलेली सर्व नवीन संसर्गग्रस्त रुग्ण हे परदेशातून आलेले असल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे.

चीनमधील कोविड 19 रुग्णसंख्या आता  90 हजार 671 एवढी असून, मृतांचा आकडा 4 हजार 636 इतका आहे, त्यापैकी बरीच वुहान रहिवासी आहेत.

नॅशनल हेल्थ कमिशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये सुमारे 265 दशलक्षांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.