विजांच्या कडकडात, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

0

- Advertisement -

पूणे: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारपासून पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी पावसाळी स्थिती निर्माण होण्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील पाच दिवस विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज दिवसभरात सांगली, कोल्हापूर, ठाणे आदी जिल्ह्यातील काही तालूक्यांत गारपीटीसह पाऊस झाला आहे.

- Advertisement -

दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस असल्याचे भारतीय हवामान संस्थेचे के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.