वादळी वारे, प्रचंड पावसासह ‘यास’ चक्रीवादळ धडकले, पहा धक्कादायक व्हिडीओ

0

- Advertisement -

नवी दिल्ली : अती भीषण रुप घेतलेल्या यास चक्रीवादळाने ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार मुसंडी मारली असून बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी ओलांडून ते आता ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या भुभागात दाखल झाले आहे. ये्त्या २ ते ३  तास वादळाची तीव्रता जास्त असणार आहे.  चक्रीवादळामुळे अनेक भागात वादळी वारे वाहत आहे तर काही भागात जोरदार पाऊस होत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार या चक्रीवादळ आता वेगाने  पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ सकाली नऊ वाजता ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यातील भ्रमक येथे पोहोचले होते. या ठिकाणी उंच लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु होता. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगाल राज्यालाही इतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाचे महानिदेश मृत्यूंज महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ बालेश्वर च्या दक्षिण देशेला ओडिशाच्या किनारपट्टीवरुन पुढे सरकत आहे. वादळी वारे सध्या प्रतितास 130 ते 140 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहू लागले आहे. काही काळ वाऱ्याचा वेग कायम राहिली. त्यानंतर साधारण 3 तासांनी वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होत मंद होत जाईल.

उद्या सकाळपर्यंत हे वादळ झारखंडपर्यंत पोहोचेल. त्या वेळी वाऱ्याचा वेग कमी होऊन तो साधारण प्रतितास 60 ते 70 किलोमीटर इतका राहिल. अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर आणि दक्षिण 24 परगना येथे तटीय परिसरात चक्रीवादळामुळे पाणी शिरले आहे. नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान प्रसार भारती न्यूज सर्विस या सरकारी वृत्तसंस्थेने ट्विट करून यास वादळाचा एक धक्कादायक व्हि़डीओ ट्विट केला असून त्यात तो यास वादळ  ओडीशातील बालासोर जिल्ह्यात भुभागावर धडकले तेव्हाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.