मान्सूनची वाटचाल वेगवानच ‘या’ जिल्ह्यांत पोहोचल्याची हवामान विभागाची माहीती

0

- Advertisement -

मुंबई: केरळमधून वेगवान वाटचाल करत मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर आता रायगड, पुणे आणि मराठवाड्याच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुण्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला असून मुंबईतही पावसाचे ढग जमा झाले आहेत.

- Advertisement -

मान्सूनने आगेकूच करत अलिबाग, रायगड., पुणे, मराठवाड्यातही अनेक भागांत मान्सूनला सुरुवात झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने जाहीर केली अशी माहिती राज्याचे हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सूचा पुढील प्रवास आता संपूर्ण महाराष्ट्राभर सुरु झाला आहे. त्यामुळे काही तासांतच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे काही वेळातच राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.