मुंबई अलर्टवर; 90 ते 100 किमी प्रतीतास वेगाने गुजरातच्या दिशेने सरकते आहे ‘तौक्टे’ चक्रीवादळ

0

- Advertisement -

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम मुंबईत सकाळपासून (Mumbai rains) जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलले हे वादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात याचा प्रभाव जाणवत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना त्याचा फटका बसला आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.

मुंबईत 90 ते  100 किमी प्रति तास इतक्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. सोमवार संध्याकाळ पर्यंत अशीच परिस्थिती राहील असे मुंबई हवामान विभागाने म्हटले आहे.

मुंबईत चक्रीवादळाचे परिणाम दिसत असून, अनेक भागात झाडे पडली आहेत तर काही ठिकाणी  संततधार पावसाने पाणि तुंबले आहे. मात्र कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन मुंबई महापालिकेनने केले आहे. तसचे मुंबई विमानतळ आणि वरळी सी-लिंक सुरक्षतेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

 

महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळाची तीव्रता असेल, इतर भागात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं IMD चे कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.