आनंदाची बातमी; वादळानंतर नैऋत्य मान्सून वारे सक्रीय, 1 जूनला होतील केरळात दाखल

0

- Advertisement -

यंदा मान्सून निश्चित तारखेच्या आधीच केरळमध्ये दाखल होणार आहे. उद्या पासून म्हणजेच २१ मे पासून देशात मान्सून दाखल होणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या ४ आठवड्यांमध्ये काही राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

उद्या म्हणजेच २१ मे शुक्रवारी नैऋृत्य मोसमी वारे अंदमान बेटावर पोहचणार आहेत. त्यानंतर १ जूनला हे वारे केरळमध्ये दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या ४ आठवड्यात केरळ किनारपट्टी,कर्नाटक,तमिळनाडूमध्ये सरासरीपेक्षी जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एक आठवड्यात बंगालच्या उपसागरात आणि उत्तर पूर्व भागातील राज्यांमध्येही पावसाचा जोर कायम राहिल.

दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार होत असल्याचा अंदाज देखिल हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तेथे कमी दावाच्या क्षेत्राचे चक्री वादळातही रुपांतर होऊ शकते, त्यास Yaas  असे नावही देण्यात आले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे दक्षिण भारत,पूर्व मध्य भारत,उत्तर पूर्व भारतातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम किनारपट्टी, पुर्व उत्तर प्रदेश, बिहारमध्येही येत्या ३ ते ४ आठवड्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात नैऋृत्य मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे सॅटेलाईट इमेजमधून दिसत आहे. भारतीया हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे वारे २१ मे रोजी अंदमान समुद्रात जाण्याची शक्यत आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.