धक्कादायक : पृथ्वी होतेय अंधूक, प्रकाश परावर्तनात झालीय लक्षणीय घट, तापमानवाढीचा असाही धोका

0

- Advertisement -

वॉशिंग्टन – समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत असल्याने त्यामुळे पृथ्वीच्या प्रकाश परावर्तनात घट झाली आहे, असे अॅडव्हान्सिंग अर्थ अॅण्ड स्पेस सायन्स या संस्थेने केलल्या एका अभ्यासात म्हटले आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये पृथ्वीच्या प्रकाश परावर्तनात किंवा ‘अल्बेडो’मध्ये लक्षणीय घट झाली आहे. हे शोधण्यासाठी संशोधकांनी पृथ्वीच्या प्रकाशमापनाचा म्हणजेच पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश जो चंद्राच्या पृष्ठभागाला प्रकाशमान करतो त्याचा वापर केला. तसेच ह्या अभ्यासात उपग्रहांची मदत घेऊनही प्रकाशाचे मोजमाप करण्यात आले. अॅडव्हान्सिंग अर्थ अॅण्ड स्पेस सायन्स या संस्थेने आपल्या जिओफिजिकल रिसर्च जर्नलमध्ये या नवीन अभ्यास प्रकाशित केला आहे.

काय आहे Albedo ?

अल्बेडो म्हणजे ग्रह किंवा चंद्रावर पडणा-या प्रकाशाचे किंवा किरणोत्सर्गाचे प्रमाण, जे त्या ग्रहाच्या पृष्ठभागाद्वारे परावर्तित होते.

पृथ्वी आता 20 वर्षांपूर्वीच्या तुलनेत प्रति चौरस मीटर सुमारे अर्धा वॅट कमी प्रकाश परावर्तित करत आहे,

ज्यामध्ये बहुतेक ड्रॉप गेल्या तीन वर्षांच्या माहितीत समोर आले आहे. पृथ्वीवर येणा-या सूर्यप्रकाशाच्या 30% प्रकाश पृथ्वीवरून परावर्तित होत असतो, प्रकश परावर्तनात आलेली घट ही एकूण परावर्तनाच्या 0.5% इतकी असल्याचे अभ्यासात मांडण्यात आले आहे.

“आम्ही अल्बेडोची गेल्या 17 वर्षाची माहिती गोळा केली. त्यात अलिकडील तीन वर्षांच्या माहितीचे विश्लेषण केले तेव्हा अल्बेडो ड्रॉप आम्हाला आश्चर्यचकित करणारा होता.” असे न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधक आणि नवीन अभ्यासाचे प्रमुख लेखक फिलिप गुडे यांनी म्हंटले आहे.

Earthshine annual mean albedo 1998–2017 expressed as watts per square meter (W/m2). The CERES annual albedo 2001–2019, also expressed in, are shown in blue. A best fit line to the CERES data (2001–2019) is shown with a blue dashed line. Average error bars for CERES measurements are of the order of 0.2 W/m2. Credit: Goode et al. (2021), Geophysical Research Letters

- Advertisement -

दक्षिण कॅलिफोर्नियातील बिग बीयर सोलर वेधशाळेने 1998 ते 2017 पर्यंत पृथ्वीवरील माहिती गोळा केली आहे. मागील वर्षांमध्ये काही नवीन माहिती त्यात जोडली गेली तेव्हा पृथ्वीच्या प्रकाश परावर्तन मंद होण्याचा कल स्पष्ट झाल्याचे अभ्यासात समोर आले.

पृथ्वीवर पोहोचणाऱ्या निव्वळ सूर्यप्रकाशावर दोन गोष्टींचा परिणाम होतो: सूर्याची चमक आणि ग्रहांची परावर्तकता. संशोधकांनी केलेल्या संशोधनात पृथ्वीच्या अल्बेडो मधील बदलांचा सूर्याच्या प्रकाशात वेळोवेळी होणाऱ्या बदलांशी संबंध नाही, म्हणजे पृथ्वीच्या परावर्तकतेतील बदल पृथ्वीवरील एखाद्या गोष्टीमुळे होत असल्याचे म्हटले आहे.

विशेषतः नासाच्या Clouds and the Earth’s Radiant Energy System (CERES) या प्रकल्पाचा भाग म्हणून केलेल्या उपग्रह मोजमापानुसार, अलिकडच्या वर्षांत पूर्व प्रशांत महासागरावर परावर्तक ढगांमध्ये घट झाली आहे.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरही समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ नोंदवली गेली आहे कारण Pacific Decadal Oscillation नावाच्या हवामानाच्या तयार झालेल्या परिस्थिती, ज्याचा थेट संबंध जागतिक हवामान बदलाशी आहेत.

पृथ्वीची अंधुकता अर्थात प्रकास परावर्तनात आलेली घट म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा की पृथ्वीच्या हवामान प्रणालीद्वारे अधिक सौर ऊर्जा शोषली जात आहे. एकदा का ही अतिरिक्त सौर ऊर्जा पृथ्वीच्या वातावरणात आणि महासागरांमध्ये आली, की ती जागतिक तापमानवाढीस आणखी हातभार लावू शकते. एकूणच पृथ्वीवरील विविध नैसर्गिक घटकांच्याही तापमानात वाढ होऊ शकते.

अनेक शास्त्रज्ञांना आशा होती की अधिक सुर्यप्रकाश शोषल्याने पृथ्वीवर उबदार वातावरणात अधिक ढग आणि उच्च अल्बेडो होऊ शकतात, जे नंतर तापमानवाढ कमी करण्यास आणि हवामान व्यवस्थेला संतुलित करण्यात मदत करू शकतात. परंतु  आता हे संशोधन अगदी उलट परिस्थिती दर्शवित असल्याचे अधोरेखित करते आहे.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.