मोठी बातमी; आता घरी बसून करा स्वत: ची कोरोना चाचणी, केवळ 250 रुपयांत

0

- Advertisement -

कोरोनासाठी वैद्यकीय चाचणी कऱण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या, अनेकवेळा रांगेत उभे रहावे लागत होते तर काही ठिकाणी चाचणी उपकरणांची कमतरता होत होती त्यामुळे अनेक जणांना चाचण्या करता येत नव्हत्या. आता त्यावर उपाय म्हणून इंडियन कौंन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च (ICMR) या संस्थेने कोणाही व्यक्तीला घरच्या घरीच कोरोनाची चाचणी करता येईल अशा कोविसेल्फ नावाच्या एका चाचणी उपकरणास (टेस्ट किट्) मान्यता दिली आहे. अनेक ठिकाणी जेथे वैद्यकिय सुविधा उपलब्ध होत नव्हत्या त्या ठिकाणी आता नागरिकांनाना स्वतःच चाचणी करता येणे शक्य झाले आहे.

ICMR ने घरी कोरोना टेस्ट करण्यासाठीची चाचणी किट आणि त्याचा वापर या विषयी एक सुचना जारी केली आहे. नागरिकांना घरी कोरोना टेस्ट करण्याच्या उद्देशाने कोविसेल्फ (coviself) नावाच्या किटला मान्यता दिली असून त्या किटच्या माध्यमातून नाकाद्वारे कोरोना तपासणीसाठी घरातच नमुने घेतले जाऊ शकतात. या जलद प्रतिजैविक (Rapid Antigen Test) चाचणीसाठी केवळ नाकाद्वारेच्या स्वॅबची आवश्यकता असेल.

जेथे कोणतीही वैद्यकीय व्यावसायिकांशिवाय कोणतीही व्यक्ती स्वत: ची चाचणी घेऊ शकते. या किटची किंमत केवळ 250 रुपये आहे आणि 15 मिनिटांत चाचणीचा निकालही मिळेल.

कोविसेल्फ चाचणीमध्ये, 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक स्वत: ची चाचणी करू शकतात. हे होम रॅपिड अंन्टीजेन टेस्टिंग (𝐑𝐚𝐩𝐢𝐝 𝐀𝐧𝐭𝐢𝐠𝐞𝐧 𝐓𝐞𝐬𝐭𝐬 (𝐑𝐀𝐓𝐬) किट आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍या किंवा संक्रमित व्यक्तीच्या संसर्गामुळे होणार्‍या लोकांकडून याचा उपयोग केला जाऊ शकतो. परंतु या घरगुती चाचणी किट्स द्वारे केल्या जाणा-या चाचण्यांचा अतिवापरही टाळवा असा सल्ला ICMR ने दिला आहे.

यापैकी केवळ ज्यांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे, जे त्यांच्या संपर्कात आले आहेत आणि ज्यांना संसर्गाची लक्षणे दिसली आहेत त्यांच्याच वेगवान किटद्वारे तपासणी केली जावी.

किट कसे वापरावे

- Advertisement -

किट वापरताना, त्याबरोबर एक वापराविषयीची माहीती दिलेली असून याशिवाय आयसीएमआरने एक व्हिडिओ लिंकही दिली आहे. ज्याला वघून चाचणी केली जाऊ शकते. या किटमध्ये चाचणी करण्यासाठी सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत.

चाचणीसाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाइलवर मायलाब अॅप (mylab) डाउनलोड करावे लागेल. यानंतर, संपूर्ण माहिती त्यात प्रविष्ट करावी लागेल. आपल्याला केवळ मोबाइल अॅपद्वारे चाचणी सकारात्मक आहे की नकारात्मक या अहवाल प्राप्त होतील.

अपमधील डेटा सुरक्षित सर्व्हरवर स्टोअर केला जाईल, जो आयसीएमआर कोविड – 19 चाचणी पोर्टलला जोडलेला असेल. या प्रक्रियेत रुग्णांची गोपनीयता राखली जाईल. या चाचणीद्वारे सकारात्मक अहवाल असणा-यांना सकारात्मक (Cororna Positive) मानले जाईल. त्या रुग्णांना इतर कोणत्याही चाचणीची आवश्यकता नाही. ज्या नागिरकांची चाचणी नकारात्मक नोंदविली गेली जाईल आरटी-पीसीआरद्वारे चाचणी करून घेण्याची निवड करु शकतात, असे आयसीएमआरने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केले आहे.

हे किट महाराष्ट्रातील एका प्रयोगशाळेद्वारे विकसित केले गेले आहे. पुणेस्थित माय लॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स लिमिटेडला या कंपनीला  होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी आयसीएमआर द्वारे अधिकृत केले गेले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.