राज्यात बरे होणा-यांचे प्रमाण लक्षणीय; देशात मृत्युंचे प्रमाण चिंताजनक

0

- Advertisement -

राज्यात करोना रुग्ण संख्येत घट होत असून बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या 24 तासांत राज्यात ३४ हजार ३१ नवे करोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर ५१ हजार ४५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९१.०६ टक्के इतके झाले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या 24 तासांची आकडेवारीत ही माहिती दिली आहे.

तर राज्यात 24 तासांत करोनामुळे ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मृत्यूदर हा १.५४ टक्के इतका आहे.

गृहविलगीकरण असलेले ३० लाख ५९ हजार ९५ रुग्ण राज्यात आहेत तर २३ हजार ८२८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत.

- Advertisement -

सध्या राज्यात ४ लाख १ हजार ६९५ सक्रीय करोना रुग्ण आहेत

 

देशांतील मृत्युंचे प्रमाण चिंताजनक

वाढत्या मृत्यूमुळे देशाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी संपलेल्या 24 तासांत ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा २ लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचला आहे.

देशात मागील २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.