जून महिन्यात ‘सिरम’ देणार कोविशिल्ड लसीचे 10 कोटी डोस

0

- Advertisement -

नवी दिल्ली:  देशात करोना लसींचा असलेला तुटवडा भरून काढण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. आता यातच 10 कोटी डोस येत्या जून महीन्यात उपलब्ध करून देणार असल्याची माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आज (30 मे) देण्यात आली आहे.

येत्या जून महिन्यात 10 कोटी कोविशिल्ड लसीचे  डोस उपलब्ध करून देणार असल्याचे पत्र आज सिरम इन्स्टिट्युटने केंद्र सरकारला दिले आहे. हे पत्र सिरम इन्स्टिट्यूटच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी लिहीले आहे.

“आम्हाला आपणास सांगण्यास आनंद होत आहे की, येत्या जून महिन्यात आम्ही १० कोटी कोविशिल्ड व्हॅक्सिनची निर्मिती करीत पुरवठा करणार आहोत. मे महिन्यात आम्ही ६.५ कोटी डोसची निर्मिती केली होती आणि पुरवठा केला होता, असे सिंग यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

देशाला कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या बाबतीत आत्मनिर्भऱ बनविण्याच्या दृष्टीकोनातून लस उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर आपले मार्गदर्शन आमच्यासाठी खुप मोलाचे आहे. त्याबद्दल आपले आम्ही आपले आभारी आहोत. तसेच देशातील मागणी पाहता आम्ही लसीचे उत्पादनात सतत वाढ करीत आहोत. वाढविण्यात आले आहे. सिरम इन्स्टिट्युट देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटीबद्ध आहे. आमची संपूर्ण टीम सरकारच्या खांद्याला खांदा लावून करोनाविरुद्ध लढण्यास मैदानात उतरली आहे”, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

याआधी मे महिन्याच्या सुरवातीस ‘सिरम’ने जूनमध्ये 6.5 कोटी, जूलैमध्ये 7 कोटी तर ऑगस्ट महिण्यात 10 कोटी कोविशिल्ड लसीचे डोस देण्याचे केंद्र सरकारला कळविले होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.